सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती #भूषण_गवई यांच्या हस्ते #मूर्तिजापूर न्यायालयाचे कोणशीला समारंभ.
सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती #भूषण_गवई यांच्या हस्ते #मूर्तिजापूर न्यायालयाचे कोणशीला समारंभ
अनेक न्यायधीश सह वकिलांची उपस्थिती
न्यायधीश #गवई यांनी आपल्या बालपणी च्या आठवणीला दिला उजाळा
मुर्तीजापुर जिल्हा अकोला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोणाशीला समारंभ कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते तर मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत मुर्त्यापुर येथील सालासर रिसॉर्ट येथे अतिशय थाटात संपन्न झाला.
गेल्या अनेक वर्षापासून मुर्तीजापुर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारती करिता प्रयत्न सुरू होते नूतन इमारतीच्या हेजागेचा तिढा सोडण्याकरिता मुर्तीजापूर बार असोसिएशनच्या वतीने एडवोकेट नरेंद्र काळे यांनी एकदिवसीय उपोषण सुद्धा केले होते अखेर न्यायालयाच्या इमारतीकरिता मुर्तीजापुर एमआयडीसी परिसरात शासनाने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचा कोणसीला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायमूर्ती विजय जोशी न्यायमूर्ती अविनाश घरोटे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती संजय माहुरे, न्यायमूर्ती वन शिवराज खोब्रागडे, न्यायमूर्ती सुनील शिखरे, प्रधान सचिव विधी परावर्षी महाराष्ट्र शासन श्रीमती सुवर्णा केवले, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला राजेश तिवारी. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायाधीश मूर्तीजापुर आशीफ तांबोळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवळी यांनी मूर्तिजापूर शहरा बद्दल आपले भावनिक नाते असल्याचे सांगीत आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायाधीश तसेच विधीज्ञ , अमरावती वरून बार असोसिएशन माजी अध्यक्ष सुनील बोळे , विधिज्ञ शिरीष ढवळे मुर्तिजापूर चे विधिज्ञ त्र्यंबक येथवर, संजय अग्रवाल सचिन वानखडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.