गुरूकुंज मोझरी : गोपालकाला व पालखी प्रदक्षिणेने पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप गुरुकुंज ते मोझरी पालखी प्रदक्षिणा गोपालकाला, महाप्रसाद व खंजिरी भजनाने करण्यात आला. गुरुकुंज आश्रमात आठ दिवसचाललेल्या पुण्यतिथी महोत्सवात, सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थना त्यावरील चिंतन, ग्रामगीताप्रवचन, आरोग्य व रक्तदान शिबिर, खंजिरी भजन, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कीर्तन संमेलन इत्यादीकार्यक्रम घेण्यात आले होते. गोपालकाल्याची सुरुवात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांच्या क्रांतीकारी अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. काल्याचे कीर्तन सचिन पवारह्यांनी सादर करतांनी असे सांगितले की, ज्या संतांच्या मागे जायचे आहे त्यांच्या विचारांची चिकित्सा अगोदरकरावी तसेच या संतांच्या मागनि जात असतांना कृतीवर संयम व बोलण्यावर नियंत्रण ठेवले तरच संतांचाबोध प्राप्त होतो. राष्ट्रसंतांच्या साहित्यात सर्वधर्माचा सार असल्यामुळे त्यांचा विचारांचा प्रसाद घेऊन त्यांचे साहित्य घरी सोबत न्यावे हाच खरा गोपालकाला आहे. काल्याच्या या कीर्तनाला साथसंगत रघुनाथ कर्डीकर, श्रीकृष्ण झगेकर, शरद हिवराळे, श्रीकांत भोजने, भाष्कर काळे, बाळा बेलनकर, पंकज पोहोकार, पराग पदवाड, दिलीप कराळे, गजानन गायकवाड, राजेंद्र आकोटकर यांनी केली. पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला संचालक मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, आजीवन प्रचारक लक्ष्मणदास काळे, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग प्रमुख गुलाब खवसे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम पाळेकर,अॅड. दिलीप कोहळे, रामदास देशमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, जीवन व आजीवन प्रचारक तसेचविशेष अतिथी म्हणून सयाजी महाराज, नाना महाराज परसोडीकर, मधुकर खोडे महाराज, डॉ. सुनील सूर्यवंशी, अभिजीत बोके, आचार्य हरिभाऊ वेरूळकर, बापूसाहेब देशमुख, श्रीकृष्ण गिरीधर इत्यादी उपस्थित होते. त्यांचे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्यावतीने यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लक्ष्मणदास काळे, लक्ष्मण गमे, सुनील सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री गुरुदेव मासिकाचा दिवाळी विशेषांक आणि श्री गुरुदेव दिनदर्शिका, प्रकाश कठाळे लिखित अनुभव यात्रा,माणिकदास बेलुरकर लिखित या कोवळ्या कळ्या माजी इत्यादी पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रकाशन विभागाचे विभाग प्रमुख गोपाल कडू यांनी केले व आभार . गोपाल काला तयार करण्यासाठी व त्याचे व्यवस्थित वितरण करण्यासाठी डॉ. एकनाथ मोहोड, विवेक दिघडे, प्रा. सुहास टप्पे यांच्यासह श्रीगुरुदेव आयुर्वेद कॉलेजचे विद्यार्थी, श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाचे विद्यार्थी, श्रीगुरुदेव विद्यामंदिर यामधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. आरती व राष्ट्रवंदनेने गोपालकाल्याची सांगता करण्यात आली.