दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने बोगस जातीचा ठपका असलेला उमेदवार लादू नये-संजय आठवले.
दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने बोगस जातीचा ठपका असलेला उमेदवार लादू नये-संजय आठवले संधीसाधू आणि सत्तापिपासू नेत्यापासून भाजपाने सावध राहावे.
आगामी विधानसभेचा शंखनाद महाराष्ट्रामध्ये झालेला आहे दर्यापूर विधानसभा मध्ये स्थानिक उमेदवार उमेदवारी मिळण्यासाठी युद्ध स्थळावर प्रयत्नशील आहेत अशातच संधीसाधू आणि सत्तापिपासू नेते उमेदवारी मिळण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठीकडे विनवण्या करीत आहे बोगस अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या चा ठपका असलेला उमेदवार सुद्धा लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर दर्यापूर विधानसभेमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी पक्षश्रेष्ठीकडे लोटांगण घालून पायघड्या घालणे सुरू आहे भाजपाचे निष्ठावंत आणि सच्चे कार्यकर्ते यांच्यावर हा अन्याय होणार आहे अनुसूचित जाती मधील सर्वच घटक संवर्ग जाती बौद्ध,मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मीक समाज अशा अनेक छोट्या-मोठ्या जाती भाजपापासून दुरावल्या जातील असे भाकीत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांनी केले आहे दर्यापूर विधानसभे मधून जर लोकसभेमध्ये पराभूत आणि अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र वापरून असलेल्या उमेदवाराला जर भाजपाने उमेदवारी दिली तर त्यांचा अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच मतदारांनी जाहीर निषेध करावा असे खुले आव्हान भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांनी केले आहे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ संदर्भात लवकरच स्थानिक नेत्यांची आणि अनुसूचित जातींच्या पदाधिकाऱ्यांची तात्काळ बैठक गोपाल चंदन, मनोज लेवटे प्रमोद खंडारे, विनोद दुर्गे, डॉ.धनराज चक्रे, राजेंद्र तांबेकर, सुधीर थोरात, संजय आठवले यांच्या नेतृत्वात होणार असल्याचेही संजय आठवले यांनी नमूद केले आहे.