India News
मुंबई : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरील चर्चासत्र संपन्न.
नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम नागपूर) यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झाले. या परिषदेला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित मान्यवर उपस्थित होते.