गुन्हे शाखा अकोला कडून एनडीपीएस कायद्यांतर्गत दबंग कार्यवाही
निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पोलीस अवैध धंद्यांवर करडी नजर रोखून आहेत गुन्हे वंशाखा अकोला कडून एनडीपीएस कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीत २ करोड, ३८लाख, ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय ग्रामीण पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके व स्थानिक गुन्हे शाखा पथक हे निवडणूक आचारसंहिता दरम्यान अवैध व्यवसायाविरोधात कार्यवाही करत असताना महिरती मिळाली कि बार्शीटाकळी हद्दीतील महागावरोडवर महंमद शमी यांच्या बंद जिनींगमध्ये काही लोक अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना चालवत आहेत या माहितीवरुन धाड रासायनिक द्र्व्यवर रासायनिक प्रक्रिया करत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी घटनास्थळावरुन प्रयोगशाळा उपकरणे, सिरॅमिक फनेल,काचेचे चम्बू विविध मापे,व्हॅक्युम मोटार मशीन, हॉट एअर ओव्हन तसंच लाखो रुपयांचे किमती उपकरणं जप्त करण्यात आले मुख्य आरोपी आदिल मोहम्मद शमीम अन्सार हा असून त्याच्या सांगण्यावरून कच्च्या मालाचे रसायन,५ लाख रुपये किमतीची कार, ५ हजार ५४८ किलो अंमली पदार्थ किंमत १कोटी,३८ लाख ७० हजार असा एकूण २ कोटी ३८लाख,७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.