LIVE STREAM

Latest NewsLocal News

धक्कादायक! दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सीना नदीत 4 ऊसतोड कामगार बुडाले, शोधकार्य सुरु माढा, तालुक्यात घडली घटना  

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी माढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. माढा तालुक्यातील सीना नदी यवतमाळ जिल्ह्यातील 4 ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले आहेत. ही घटना तालुक्यातील खैराव येथे घडली आहे. अद्याप यातील एकाही मजुराचा शोध लागला नाही. शोधकार्य सुरु आहे.

चार ऊसतोड मजूर सीना नदीपात्रात बुडाले आहेत. हे सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ऊसतोड करण्यासाठी या भागात आले होते. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अद्याप यापैकी एकाचाही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेत बुडलेल्या मजुरामध्ये शंकर विनोद शिवणकर (वय 25), प्रकाश धाबेकर (वय 26), अजय महादेव मंगाम (वय 25), राजीव रामभाऊ गेडाम (वय 26) सर्व रा. लसणा टेकडी ता. जि. यवतमाळ हे ऊसतोड मजूर आहेत.

अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेले असता घडली घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऊसतोड कामगारांची टोळी जगदाळे वस्ती, खैराव ता माढा या ठिकाणी आली होती. जवळच सीना नदीवर हे चौघे कुटुंबातील इतर सदस्यासह अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेले होते. शंकर हा प्रथम पाण्यात गेल्यावर बुडायला लागल्यावर प्रकाश त्यास वाचवण्यासाठी गेला होता. तोही बुडू लागल्याने इतर दोघेही पाण्यात उतरले सीना नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चौघेही पाण्यात बुडाले आहेत. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून दोन तासानंतरही अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!