Uncategorized
मतदान टक्केवारी वाढविण्याकरिता प्रशासनाची तरुणांना साद
येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता प्रशासनाच्या वतीने विविध पावले उचलली जात असून त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच उपक्रमांतर्गत शहरातील तरुणांना प्रशासन आवाहन करीत आहे.
शहरातील विविध खेळाची मैदाने, चौक अशा ठिकाणी नवीन तरुण मतदार यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याकरिता करून मतदारांना एकत्र आणून स्वीप नोडल अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप विभागाच्या वतीने मतदानाची शपथ दिली जात आहे.
तसेच मतदान करणे का आवश्यक आहे याबद्दल माहिती देऊन मतदानाचे महत्त्व या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.
नुकतेच विदर्भ महाविद्यालय चे मैदानावर स्विप नोडल अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम ,जिल्हा परिषद चे ज्ञानेश्वर घाटे, मनपा शाळा निरीक्षक श्री योगेश पखाले ,हेमंत कुमार यावले ,प्रवीण ठाकरे , सोमेश वानखडे, उज्वल जाधव ,प्रवीण ठाकरे ,संजय बेलसरे,पंकज सपकाळ ,योगेश राणे , सेवानीवृत्त शिक्षक राजेश पुसदकर यांनी मैदानावरील शेकडो तरुण तसेच वयस्कर मतदारांना मतदानाची शपथ दिली.
यावेळी श्रीधर मेंढे, नितीन करडे, अवि सूर्यवंशी, रवी डोंगरे, पवन शिवणकर, नितेश तंतरपाळे, रवी जवादे , आशिष हिवराळे, रोशन कांनादे, ऋषी तायवाडे, सचिन रायबोले, श्रीकांत दाळू व बहुसंख्य तरुण खेळाडू उपस्थित होते .