लोककला जागृत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात दिवाळीनिमित्त ‘गवळण नृत्य
पूर्वी दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गावोगावी गवळणींकडून लोकांचे मनोरंजन केले जात होते. परंतु कालांतराने मात्र टीव्ही, मोबाईलमुळे पारंपरिक व महाराष्ट्राची लोककला असलेल्या गवळणी नृत्याकडे लोकांनी पाठ फिरवली. असे असले तरी ग्रामीण भागात आजही गवळणी नृत्याची परंपरा कायम आहे. तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर, या गावात गेल्या अनेक वर्षापासून दिवाळीच्या निमित्ताने गवळणी नृत्याचा उत्साह पाहायला मिळतो.
यामध्ये पुरुष स्त्रीचे वस्त्र परिधान करून नृत्य करतो. या गवळणी नृत्याच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, या विषयी जनजागृती केली जात असून. आजपासून पुढील तीन दिवस हा उत्सव ग्रामीण भागात सुरू असतो . एकीकडे नामशेष होण्याच्या मार्गावर काही परंपरा असताना मात्र काही गावात दरवर्षी गवळणींचे आयोजन केले जाते.
काय आहे गवळण प्रकार?
गवळण ही एक लोककला आहे. पूर्वी महाराष्ट्रात गवळण हे नवीन नव्हती, परंतु सध्यास्थितीत ती स्वस्कृती लोप पावत आहे. गवळणीसाठी गावातील लोक एकत्र येऊन एक संच तयार करतात. यामध्ये ढोलकी वादक, वीणा वादक, पिपारी वादकसह, आदी लोकांचा समावेश राहतो. यामध्ये नृत्य करणारा पुरुष हा स्त्रीचे वस्त्र परिधान करून पायाला घुंगरू देखील बांधतो .हुबेहूब महिलांचा वेश परिधान करून, तसेच तो साज देखील करतो. यामध्ये ग्रामीण भागात स्वरचित गीत म्हटले जाते. या गीताच्या तालावर गवळण थिरकते. या गवळणीला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी गावात होत असून. गवळणीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गवळणीचे नृत्य केले जाते. या वेळी लोकांकडून धान्य व पैशांच्या स्वरूपात वर्गणी दारापर्यंत आलेल्या गवळणनीला दिली जाते. विशेष म्हणजे बलिप्रतिपदा या दिवशी आयोजित केलेल्या गावातील गवळणीसोबत एक ढोलक्या व एक लोकगीतगायक असतो.यात बासरी वाजविणारा युवक सर्वांचे आकर्षक ठरतो. विशेष म्हणजे ही गीते कुठल्याही पुस्तकातील नसून ती स्वता तयार केलेली असतात.
तळेगाव ठाकूर येथे पंचवीस वर्षांपासून निघते गवळण
तिवसा तालुक्यातील तळेगांव ठाकूर येथे बलिप्रतिपदा या दिवशी गावातून सकाळपासून गवळणीचे आयोजण केले जाते.गेल्या पंचवीस वर्षांपासून येथे गवळणीचे आयोजन केले जात असून सकाळी आठ वाजतापापासून या गवळण नृत्याला सुरुवात होत असून यानिमित्त गावात अनेक गवळणी दाखल होत असतात व आजपासून तीन दिवस हा उत्साह मोठया प्रमाणात ग्रामीण भागात साजरा केल्या जातो.