अमरावतीत आता राजकीय सभा गाजणार, उद्धव ठाकरे सह राज ठाकरे यांचा दौरा
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. दिवाळी नंतर खरी निवडणूक प्रचाराला जोर येणार आहे या दरम्यान अनेक पक्षाचे संस्थापक सह अध्यक्ष यासोबतच दिग्गज नेत्याची जंगी सभा आयोजित केली जाणार आहे अशा राजकीय प्रचार सभेत अनेक विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सुद्धा सोडले जाणार आहे आपापल्या पक्ष उमेदवाराच्या विजयासाठी अनेक नेते राजकीय रणांगणात उतरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघात सुद्धा अनेक मतदार संघात चुरशीची लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास विरुद्ध महायुती अशी खरी लढत पाहायला मिळणार आहे यासोबतच राष्ट्रीय पक्ष सोबतच प्रादेशीक पक्ष अध्यक्षांनी सुद्धा आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहे. आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अनेक दिग्गज नेते मतदारांना संबोधित करणार आहे अशात येणाऱ्या ७ नोव्हेंबरला उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे अमरावती जिल्ह्यात आगमन होणार आहे, सर्वात आधी दर्यापूर मतदार संघातील महाविकास आघाडी चे उमेदवार गजानन लवटे यांच्या प्रचारार्थ रोड शो मध्ये सहभाग घेणार आहे, सायंकाळी ५ वाजता बडनेरा येथील आठवडी बाजार येथे महाविकास आघाडी उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित करणर, यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुद्धा अमरावती दौरा आयोजित असून ते १० नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यात दाखल होणार आहे अमरावती विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार पप्पू पाटील यांच्या प्रचारार्थ आणि इतर उमेदवार करिता त्यांची सभा होंणार आहे. आता येणाऱ्या ७ व १० नोव्हेंबरला दोन्ही नेते सभेत काय गर्जना करणार कोणावर टीका करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे