महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विविध भागातून आशीर्वाद पदयात्रा
)दिनांक २ नोव्हेंबर-लोकसंख्या वाढली म्हणून घरे वाढली,वाहनसंख्या वाढली,त्यामुळे रस्ते लहान पडू लागले, परिणामी वाहतुकीची कोंडी होऊ लागली. आदी बाबी लक्षात घेता, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, बाजारपेठांतील पार्किंगचा प्रश्न असो तसेच शहर नियोजनातील मूळ तत्व म्हणजे पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क असो अर्थव्यवस्थेला व वाढत्या शहरीकरणाच्या विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे वाढविण्यावर आपण सातत्यपूर्ण भर दिला आहे.दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या व्यवहारापासून ते शिक्षण,प्रशासन,दळणवळण, संशोधन, अशा विविध कारणांसाठी तंत्रज्ञानातले इंटरनेची उपयुक्तता फार महत्वपूर्ण ठरू पाहत आहे. संपर्क आणि संवादात आलेली नवी क्रांती लक्षात घेता संगणक साक्षरता बघता प्रत्येक विद्यार्थ्यांना डिजिटल एज्युकेशन चा लाभ मिळाला पाहिजे, याकरिता आपण प्रयत्नशील आहोत.महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी नागरिकांशी संवाद साधित यावेळी आपली भूमिका व्यक्त केली.तसेच आर्थिक विकासाला,पर्यटनाला चालना देण्यासाठी यासोबतच कमी सुविधा असलेल्या भागात सामाजिक-आर्थिक समावेश वाढविण्यासाठी विकासात्मक कामांच्या जोडणीचा विस्तार करीत संतुलीत विकासाला चालना देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.याकरिता लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आखणी- नियोजन-व्यवस्थापन तसेच जनसामान्यांसह प्रशासनाशी समनवय साधित सर्वांनाच याचा लाभ मिळाला पाहिजे यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.जनतेनी यापूर्वी आशीर्वाद देत संधी दिल्याने आपण २०१९ ते २०२४ दरम्यान नागरिकांना अपेक्षित विकासकामांची पूर्तता करू शकलो.तसेच आता आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी आपण सर्वांनी मला आपले बहुमूल्य मतदान करीत जनसेवेची संधी द्यावी,अशी विनंती करीत सौ.सुलभाताई खोडके जनसामान्यांच्या मनाचा वेध घेत रोजच्या रोज जनतेच्या आशीर्वाद प्राप्तीचे समर्थन मिळवीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सहानुभूती, संवाद आणि सामाजिक बंध, सामाजिक प्रतिसाद, विचार प्रक्रिया,निर्णयक्षमता आणि सदैव नागरीकांचे हित जोपासण्याच्या दृष्टिकोन यामुळे महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या आशिर्वाद पदयात्रा,समूह बैठका, वाढता जनसंपर्क यासोबतच भेटीगाठीतून जनतेचे आशीर्वाद प्राप्तीसाठी दैनंदिन दिनश्चर्येनुसार अविरतपणे वाटचाल केली जात आहे. लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांप्रति बांधिलकी जोपासत तसेच एकता आणि एकात्मतेच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदोदित प्रयत्नरत राहून जनतेप्रति असलेले उत्तरदायित्व,समाजाला काही देणं लागतो ही भावना तसेच सामाजिक दायित्वाची जाणीव यामुळे अमरावती शहरातील गृहभेटीतून महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडकेंनी मतदात्यांना आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी मला भरघोस प्रतिसाद देत मतदान करण्याचे विनंतीपूर्ण आवाहन केले जात आहे.या आशीर्वाद यात्रा व सुसंवादाचे क्षणी जनसामान्यांच्या वतीने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला जात आहे.समाजव्यवस्था, उत्कृष्ट शिक्षण आणि संशोधन व्यवस्था, आर्थिक समज,उद्योजकतेला महत्व देत आपण आगामी काळात तंत्रज्ञानाचा विकास म्हणजे प्रगतीचे दालन आहे.त्यामुळे जनतेच्या जीवनात सर्वांग बदल घडवून आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक हा संगणक साक्षर झाला पाहिजे ,याकरिताच डिजिटल क्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.अशी भूमिका यावेळी आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केली.