LIVE STREAM

Latest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

मोर्शी विधानसभा मतदार संघात बंडखोरांनी वाढवलं टेंशन ! 

एकाच पक्षातील अनेक इच्छुकांनी भरले उमेदवारी अर्ज ; भाजपची वाढली डोकेदुखी ! 

नाराजांची मनधरणी करण्यात भाजपची धावपळ ! 

मोर्शी :  मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच पक्षातील अनेक इच्छुकांचे ऊमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पण त्यानंतर जे चित्र समोर आले आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच टेन्शन वाढलं आहे.

मोर्शी विधानसभा मतदार संघात मोठ्या संख्येने बंडखोर उमेदवारांचा सामना करावा लागत आहे. हे बंडखोर राजकीय गणित बिघडवणार आहेत.  त्यामुळे नाराज उमेदवार आणि बंडखोर पक्षांना अर्ज मागे घेण्याची मनधरणी करत आहेत. खरं चित्र हे  ४ नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे.  

   उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. विशेष म्हणजे मोर्शी विधानसभा मतदार संघात महायुती तर्फे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी आमदार देवेंद्र भुयार यांना जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षातर्फे माळी समाजाचे उमेदवार उमेश यावलकर यांना सुद्धा अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून यांच्याच विरोधात भारतीय जनता पक्षाचे अतिरिक्त विधानसभा प्रमुख अमित कुबडे, माजी भाजपा विधानसभा प्रमुख डॉ मनोहर आंडे, राजेंद्र आंडे, गोपाल बेलसरे, संजय खासबागे, महेंद्र भतकुले, श्रीधर सोलव, यांच्यासह आदींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक बंडखोर उमेदवार हे महायुतीत आहेत.  या निवडणुकीत मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये २८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.  

मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मोर्शी विधानसभा मतदार संघातील तिढा सोडविण्यासाठी अंतर्गत कलह व बंडखोरी आणि वाढत्या संघर्षाला आळा घालण्यावर यशस्वी होणार का?  बंडखोर उमेदवारांची मनधरणी करून त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन करणार का याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागलेले आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!