स्नेह वृध्दींगत करणारा दिपोत्सव उपक्रम सोत्साह साजरा
अमरावती : अमरावती जिल्हा वकील संघा ला दिपोत्सव ही एक उत्तम सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. या माध्यमातून वकील संघ स्नेह वृध्दींगत करण्याचे एक चांगले कार्य सातत्याने दरवर्षी करीत असते .अमरावती वकील संघाची ही परंपरा सांस्कृतिक सौदार्याला चालना देणारी आहे .असे गौरवोद्गार जिल्हा प्रमूख न्यायाधिस श्री. एस.व्ही.यार्लगड्डा यांनी वकील संघाच्या दिपोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
अमरावती वकील संघाला ही एक सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे याच अंतर्गत अमरावती जिल्हा बार असोशियन दरवर्षी दिपोत्सव हा उपक्रम मोठया थाटात साजरा करीत असते .
या वर्षी शुक्रवारी जिल्हा न्यायालय प्रांगण परिसरात दिपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा प्रमूख न्यायाधिस श्री.एस.व्ही.यार्लगड्डा हे होते तर अध्यक्ष स्थानी वकील संघाचे अध्यक्ष अँड.विश्वास काळे हे होते.
यार्लगड्डा यांनी वकील संघाच्या या उपक्रमाचे खूप कौतूक केले ते म्हणाले या पध्दतीचा असा हा चांगला उपक्रम या आधी मला कुठे होतांना दिसला नाही.
सामाजिक सौदार्य टिकवून ठेवण्या साठी वकीलांची एक सामाजिक जवाबदारी असते अमरावती वकील संघ ही समाज जवाबदारी उत्तम पणे पार पाडत आहे .
कार्यक्रम प्रारंभी दिप प्रज्वलाना नंतर वकील संघाचे सचिव अँड. चंद्रसेन गुळसुंदरे यांनी केलेल्या प्रास्ताविकात वकील संघाच्या विविध कार्याची उपस्थितांना माहिती दिली.
या वर्षी निवडणूक आचारसंहिते पूर्वी न्यायालय परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम , पक्षकार साठी शिदोरी मंडप आणि मंचक निर्माण साठी निधी मंजूर करून घेतला आहे अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष अँड. विश्वास काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली .
महिला वकीलांनी न्यायालय मुख्य इमारतीच्या प्रवेश दारा वर सुंदर रांगोळी व दिव्यांची आरास करून या कार्यक्रमाचे सौंदर्य खुलवले सर्व न्यायाधिशांनी रांगोळी व दिवे आरास पाहून महिला वकीलांच्या या कलेचे कौतूक केले .
वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. नितीन राऊत यांनी दिवाळी उत्सवा बाबत पौराणीक माहिती देवून दिवाळी का साजरी केल्या जाते याचे धार्मिक व सामाजिक महत्व काय आहे हे विवेचण केले .
वकील संघाचे वतीने जेष्ट वकीलांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून मान्यवर एस.व्ही.यार्लगड्डा जिला प्रमूख न्यायाधिस आणि कुटुंब न्यायालय न्यायाधिस आर.आर.पोंदकुळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला सर्व वकील बांधवा सह वकील संघ कार्यकारीणी सदस्य पदाधिकारी अँड.मोहम्मद वशीम शेख (ग्रंथपाल सचिव ), अँड. सोनाली महात्मे, अँड.साहू चिखले, अँड.सारीका भोंगाडे, अँड.विक्रम सर्वटकर , अँड.सुरज जामटे, अँड. गजानन गायकवाड, अँड.मांगल्य निर्मळ आदि सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले.