विधानसभा निवडणूक २०२४ निवडणूक आयोगामार्फत आज (दि.६) होणार, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभागातील तयारीचा आढावा
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्यावतीने वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागातील मतदान पूर्व तयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी बुधवार दि.६ रोजी आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती आज उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी आज दिली.
छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती विभागांची ही आढावा बैठक बुधवार दि.६ रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी २ यावेळेत स्मार्ट सिटी कार्यालय सभागृह, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार, संजय कुमार, प्रधान सचिव अविनाशकुमार तसेच मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, अनिलकुमार आदी मान्यवर तसेच छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी, परीक्षेत्र महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, आयुक्त आदी सहभागी होणार आहेत.