LIVE STREAM

Latest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

कार्यक्षम आणि पारदर्शक अंमलबजावणीतूनच खरी आश्वासनपूर्ती  होण्यासाठी कटिबद्ध – महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके

योजना केंद्राची असो,वा राज्याची ; ती अधिकाधिक प्रभावी पद्धतीने राबवून जनतेची सोय करणे महत्त्वाचे आहे-आमदार सौ.सुलभाताई खोडके..

नवी दिशा-समृद्ध विचार-आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी  सकारात्मक दृष्टिकोन-सामाजिक प्रगतीचा ध्यास घेऊन सौ. सुलभाताई खोडके यांची आशिर्वाद पदयात्रेची वाटचाल सुरू…

नवसारी-सिद्धार्थ नगर-साळवे कॉलोनी-भीम नगर येथे आशीर्वाद पदयात्रेत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांचे मतदात्यांना लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्याचे आवाहन..

महिलाशक्ती-कष्टकरी-पदवीधर-उच्च शिक्षित-ज्येष्ठ नागरिक-युवक-युवतींसह-श्रमिकांच्या सहभागाने आशीर्वाद पदयात्रेला आले लोकसहभागाचे स्वरूप..

अमरावती –
 लोककल्याणकारी योजना केंद्राची असो,वा राज्याची;ती अधिकाधिक प्रभावी पद्धतीने राबवून जनतेची सोय करणे महत्वाचे आहे.आपल्याकडील सर्वसाधारण शाळांमध्येही मुलांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास घडविण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ झाला पाहिजे यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.मुलांच्या कार्यात्मक,सामाजिक,मानसिक विकासासाठी आखलेल्या आणि शिक्षकांना तो पद्धतशीरपणे आजमावण्याची संधी देणाऱ्या कृती शाळेत घडल्या पाहिजेत,त्यांचे यथायोग्य मूल्यमापन झाले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे हीत जोपासण्यासह संघभावना आणि नैतिकता दोन्ही गोष्टी विकसित होऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी नवसारी येथे आशिर्वाद पदयात्रेत उपस्थितांना संबोधून केले.प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे कारखान्यातील उत्पादन प्रक्रियांमध्ये संख्यात्मक व गुणात्मक बदल होत आहेत. संगणक व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये विकासाची गती अधिक असल्याने या क्षेत्रातील कामगार,कारागीर व तंत्रज्ञ यांना नवीन प्रकारचे प्रगत-कौशल्य व ज्ञान देऊन त्यांना तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम करण्याकरिता हायटेक प्रशिक्षण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.राज्यात मध्यम व मोठ्या औद्योगिक आस्थापनांची तसेच लघुउद्योगांची वाढ झाल्यामुळे कुशल कामगारांची गरज निर्माण झालेली आहे, त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत, त्याकरिता विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे.तसेच आधुनिक तंत्रज्ञानानुसार झालेले बदल,औद्योगिक व सेवा क्षेत्रामध्ये असलेली मनुष्यबळाची मागणी पूर्ण होण्याला घेऊन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ झाला पाहिजे.याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.आशीर्वाद पदयात्रेत वाटचाल सुरू असताना महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांनी यावेळी नवमतदारांशी संवाद साधताना असा विश्वास सिद्धार्थ नगर येथे स्थानिकांसमक्ष व्यक्त केला.तदपूर्वी आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रणेते-महात्मा जोतिबा फुले,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यादरम्यान जागोजागी त्यांचे नागरिकांचे वतीने स्नेहील स्वागत करण्यात आले.विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो.पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशाआकांक्षांचे क्षितिज निर्माण करणारे साधन आहे. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो.नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल.याकरिता अमरावती शहरात विविध ठिकाणी वाचनालये-अभ्यासिका निर्माण करून लेखक व वाचकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला पाहिजे, याला आपली प्राथमिकता आहे.या शब्दांत त्यांनी आपला  वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी कटिबद्धतेचा मानस त्यांनी साळवे कॉलोनी स्थित नागरिकांशी हितगुज साधताना व्यक्त केला.लोकशाही म्हणजे लोकांनी ,लोकांकडून ,लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.ही लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह व महिला भगिनींसोबत  युवकांनी सुद्धा या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा व इतर मतदारांनाही मतदान करण्यास प्रवृत्त -प्रोत्साहित करावे.आज आपण घटनेने दिलेल्या प्रत्येक अधिकाराचा पुरेपूर लाभ घेत आहोत तर घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायलाच हवे.लोकशाही संवर्धनासाठी नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. कार्यक्षम आणि पारदर्शक अंमलबजावणीतूनच खरी आश्वासनपूर्ती करण्यावर आपला भर आहे.या शब्दांत त्यांनी भीम नगर येथील स्थानिकांना आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी घड्याळ या चिन्हा समोरील क्रमांक-४ चे बटन दाबून बहुसंख्येने मतदान करीत मला जनसेवेची संधी द्यावी,असे महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी नागरिकांना विनंतीपूर्ण आवाहन केले. या आशिर्वाद पदयात्रेत नवसारी-सिद्धार्थ नगर-साळवे कॉलोनी-भीम नगर येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!