विद्याथ्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची सामुहिक जबाबदारी स्वीकारावी – कमांडन्ट संतोष सिंग
विद्यापीठात आव्हान चान्सलर्स ब्रिागेड-2024 चे थाटात उद्घाटन संपन्न
अमरावती – (दि. 07.11.2024) देशामध्ये नैसर्गिक आपत्तीसह विविध आपत्ती घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी, त्यातून समाजाचे जीवीत व इतर हानीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी विद्याथ्र्यांना आव्हान स्पर्धेच्या माध्यमातून रा.से.यो. विद्याथ्र्यांना प्रशिक्षण दिल्या जात असून विद्याथ्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची सामुहिक जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन एन.डी.आर.एफ. पुणेचे कमांडन्ट श्री संतोष सिंग यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘आव्हान – 2024’ चान्सलर्स ब्रिागेड या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटनीय भाषण करतांना श्री संतोष सिंग बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, डॉ. भैय्यासाहेब मेटकर, डॉ. व्ही.एच. नागरे, डॉ. नितीन चांगोले यासह विविध विद्यापीठांचे पदाधिकारी, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन झाल्याची घोषणा करुन सिंग पुढे म्हणाले, राज्यपाल महोदयांनी 2011 पासून हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. देशासमोर विविध आव्हाने आहेत. विविध आव्हानांचा सामना करण्याची जबाबदारी विद्याथ्र्यांनी आपल्या खांद्यावर घेण्याची गरज असून त्यासाठी त्याला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन सक्षम बनविण्यात येत आहे. या शिबीरात ज्ञानासह प्रात्याक्षिकांचे मार्गदर्शन होणार असल्यामुळे प्रशिक्षित विद्यार्थी उत्तमरितीने होवून भविष्यात उद्भवणा-या विविध आव्हानांचा सामना आमचे विद्यार्थी सक्षमपणे करु शकतील, असे त्यांनी सांगितले.
जीवनात येणारी आव्हाने धैर्याने स्वीकारा-कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
जीवन जगत असतांना अनेक संकटे, आव्हानांना तोंड द्यावे लागते, मात्र अशा कठीण परिस्थितीतच खरी परीक्षा असते व अशी आव्हाने विद्याथ्र्यांनी धैर्याने स्वीकारावीत. नैसर्गिक आपत्तींना नेहमीच तोंड द्यावे लागते आहे. अशा परिस्थितीत आव्हान या उपक्रमाचे महत्वची तितकेच आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांनी या दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये प्रशिक्षित होऊन आपापल्या विद्यापीठांमध्ये असलेल्या विद्याथ्र्यांना प्रशिक्षित करावे, अशा प्रकारचे उपक्रम अमरावती विद्यापीठाकडून विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच राबविले जात आहेत. त्यामुळेच अमरावती विद्यापीठाचा नावलौकीक आहे व पुढेही अशाच प्रकारचे उपक्रम राबविले जातील, असे अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आ·ास्त केले.
व्यवस्थापन परिषदेच्यावतीने सदस्य डॉ. रविंद्र कडू प्रशिक्षणार्थी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, 1993 साली महाराष्ट्रातील लातूर येथे जेव्हा भूंकपाने हानी झाली, त्यावेळी आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने लातूर येथे जावून मदतकार्य केले होते. परंतु त्यावेळी अद्ययावत साधनसामुग्री देखील नव्हती. आपापल्या परिने सर्वांनी त्यावेळी भूकंपपीडितांना मदतकार्य केले. त्यामुळे या प्रशिक्षण शिबीरामध्ये विद्याथ्र्यांनी प्रशिक्षण घेऊन आपत्तीवेळी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये 15 नोव्हेंबर पर्यंत विद्याथ्र्यांना अग्निसुरक्षा, अग्निरोधक, जंगलाची आग, भूकंप, ज्वालामुखी, भुस्खलन, सर्पदंश, ढगफुटी, चक्रीवादळ, जैविक व रासायनिक आपत्ती, आण्विक आपत्ती, पूरग्रस्त व्यवस्थापन, रोप रेस्क्यू, प्रथमोपचार, त्सुनामी अशा विविध आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी भविष्यात येणा-या अशा अऩेक प्रकारच्या आव्हानांना धैर्याने सामोरे जावू शकतील.
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि आव्हान गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, सूत्रसंचालन महाविद्यालयीन विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी, तर आभार आयोजक व रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, एन.डी.आर.एफ. पुणे येथील चमू, महाराष्ट्र राज्याच्या 23 विद्यापीठांमधील रा.से.यो. स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.