अंबापेठ प्रभागातून महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांना वाढता जनाधार
महायुती सरकारच्या विकास योजना घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबद्ध-आ.सौ. सुलभाताई खोडके
पदयात्रेतून शिवशक्ती-भिमशक्ती व कमलशक्तीचे घडले जोरदार दर्शन..
अमरावती ०८ नोव्हेंबर :- महायुती सरकारच्या काळात महिलांना आत्मनिर्भर बनविणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, युवकांना रोजगाराभिमुख बनविणारी युवा प्रशिक्षण योजना, जेष्ठांसाठी वयोश्री योज़ना, तीर्थदर्शन योजना, अशा विविध योजना लागू करण्यात आली असून अमरावती शहरात या योजनांची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांमधून जनसामान्यांना लाभ आणि बळ मिळाले आहे. महायुती सरकारकडे जनतेच्या सर्वांगीण हितासाठी काम करण्याची एक दूरदृष्टी आहे. याचा लाभ निश्चितच अमरावतीकर जनतेला मिळाला आहे. आगामी काळातही विकासाला नवी दिशा व गती देण्यासाठी सर्व लाभांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास महायुतीच्या उमेदवार आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला.
अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ तसेच जनतेशी संवाद, भेट व आशीर्वाद घेण्याकरिता सौ. सुलभाताई खोडके यांची झंझावाती अशी जनाशीर्वाद यात्रा प्रभागा-प्रभागामध्ये सुरु आहे. याच शृंखलेत आज शुक्रवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी अंबापेठ प्रभागातील तारासाहेब बगीचा ,बुटी प्लॉट,अंबापेठ , मुधोळकर पेठ , बालाजी प्लॉट आदी परिसरात पदयात्रा केली. या दरम्यान सुलभाताईंनी सर्व परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सौ.सुलभाताई खोडके यांनी माजी महापौर विद्याताई देशपांडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. पदयात्रा मार्गस्थ होत असतांना दरम्यान स्थानिक नागरिकांनी सुलभाताईंचे औक्षण , स्वागत व सत्कार करून अमरावतीच्या सर्वांगीण विकासाठी त्यांच्या सोबत साथ व पूर्ण समर्थन असल्याचा विश्वास दर्शविला. यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक भागातील धार्मिक स्थळ व देवस्थान येथे जाऊन सुद्धा पूजन ,दर्शन करीत कृपाशिर्वाद घेतले. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती करून पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एक नियोजित कृती कार्यक्रम साकारण्यात आला आहे. अमरावतीचे धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक,पर्यटन, वैभव हे जगासमोर आणण्याचा आपला मानस असल्याचा मनोदय महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला. या पदयात्रेमधे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , भारतीय जनता पार्टी ,शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व सर्व सहकारीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शिवशक्ती-भिमशक्ती व कमलशक्तीचे जोरदार दर्शन घडवून आले. अमरावती विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांनाच निवडून आणण्याचा निर्धार महायुती समर्थकांनी व्यक्त केला. अंबापेठ प्रभागातील जनाशीर्वाद यात्रेला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने अंबापेठ प्रभागात सर्वत्र घड्याळ चा बोलबाला दिसून आला.