दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिÏफ्टग (महिला व पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित
अमरावती (दि. 08.11.2024) – आचार्य नागार्जून विद्यापीठ, गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे होणा-या दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिÏफ्टग स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे महिला व पुरुष संघ घोषित करण्यात आले आहे.
महिला संघ
महिला संघाच्या स्पर्धा 26 ते 28 नोव्हेंबर, 2024 दरम्यान होणार असून, प्रशिक्षण वर्ग सिताबाई कला व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे दि. 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. चमूमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय, अकोटची कु. ज्योती आवंडकर, कु. माधुरी नाथे व कु. इ·ारी अर्बळ, श्रीमती एल.आर.टी. महाविद्यालय, अकोलाची कु. वैष्णवी पांडे, कला व वाणिज्य महाविद्यालय, येवदाची कु. अंजली इंगळे, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावतीची कु. नेहा कलोसिया, श्री व्ही.आर. महाविद्यालय, सावनाची कु. साक्षी बुरकळे, विज्ञान महाविद्यालय, मलकापूरची कु. अदिती तायडे, कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाची कु. विशाखा बोबडे व श्री एन. कला व वाणिज्य महाविद्यालय, अकोटची कु. ममता तायडे हिचा समावेश आहे.
पुरुष संघ
पुरूष संघाच्या स्पर्धा 30 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर, 2024 दरम्यान होणार असून, प्रशिक्षण वर्ग सिताबाई कला व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे दि. 18 ते 27 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. चमूमध्ये कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाचा अनुराग मौर्य व कार्तिक मिश्रा, एन. राणा महाविद्यालय, बडनेरा रेल्वेचा साहील तायडे, जनता ए.अॅन्ड सी. महाविद्यालय, मलकापूरचा चेतन तायडे, विनायक विद्यामंदीर, अमरावतीचा सुमित देवतळे, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा भूपेंद्र सिंग व मयूर डेंडुले, पी.आर.एम.आय.टी. अॅन्ड आर. बडनेरा रेल्वेचा मुरसलीन पठाण आणि स्व. कु. ए.सी. अॅन्ड एम.एन. महाविद्यालय, कोंडाळाचा धनंजय गुडेवार यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.