जनतेप्रति आदर,सचोटी आणि विश्वासार्हता जपत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके यांची आशीर्वाद पदयात्रेचा झंझावात
प्रामाणिकपणा, सर्वोत्कृष्टता आणि सेवा या मूल्यांप्रति ठाम कटीबद्धता जोपासनेला प्राधान्य-महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई खोडके..
ज्येष्ठांकडे असणाऱ्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोगाने सामाजिक ऐक्य -विकासाला बळ-आमदार सौ.सुलभाताई खोडके..
रहाटगाव प्लॉट-रहाटगाव गांव-भुतेश्वर चौक-जनार्धन पेठ येथे आशिर्वाद पदयात्रेत सर्व समाजघटकांचा सहभाग..
चुनाभट्टी-देशपांडे वाडी-प्रभात कॉलोनी-श्रीनाथ वाडी येथे आगामी विकासाची दूरदृष्टी व नियोजित कृती कार्यक्रमाची आशिर्वाद पदायात्रेतून माहिती..
अमरावती ०९ नोव्हेंबर :- वर्तमान परिस्थितीत सुधारित जीवनशैली आणि आधुनिक औषधोपचार यामुळे मानवाचे आयुष्यमान वाढत असल्याने भारतात ज्येष्ठांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणार आहे. असे अर्थतज्ज्ञांच्या मते भाकीत व्यक्त केले जाते. म्हणजेच आपल्या तारुण्यात आजच्या ज्येष्ठांनी मोलाचा हातभार लावला आहे, यात शंका नाही. परंतु ,भारतात सध्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत होणाऱ्या बदलांमुळे वृद्धांसमोर अनेक समस्या उभ्या राहत आहेत, हे देखील तेव्हढेच सत्य आहे. आर्थिक,शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल व परावलंबी झालेल्या वृद्धांचे पालनपोषण, उदरनिर्वाह,आरोग्यात्मक इत्यादी अडचणी स्वतः वृद्धांपुढे आणि समाजापुढे गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत.आयुष्यभर धावपळ केल्यानंतर वृद्धत्वमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनशैलीशी समायोजन साधणे अनेक वृद्धांना कठीण जाते.आयुष्यातील उमेदीच्या काळात अर्थात तारुण्यात प्रचंड मेहनत करून समाजाचा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे आजचे वृद्ध आयुष्याच्या सांजवेळी समाजाकडे बऱ्याच अपेक्षांनी आणि आशेने बघत असतात. त्यांची अपेक्षा एव्हढीच कुटुंबीयांनी,समाजाने आणि देशवासियांनी त्यांना आदरयुक्त-सन्मानपूर्वक वागणूक द्यावी,त्यांची होणारी अवहेलना कुठेतरी थांबावी.खरेतर त्यांच्या प्रचंड अनुभवांचा आपल्या देशाच्या प्रगती करिता उपयोग होऊ शकतो. परंतु,त्याकरिता गरज आहे ती जरा सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची आदी बाबी लक्षात घेता,ज्येष्ठ नागरिकांच्या उर्वरित आयुष्यात स्वतः पुरते आर्थिक स्वावलंबीत्व,आरोग्यदायी आणि जीवन जगण्याची शाश्वती यासारख्या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात,यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.या शब्दांत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी रहाटगाव येथिल स्थानिकांशी संवाद साधला. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यावर आपला भर आहे,असे सांगून त्यांनी सर्व वरिष्ठांनी शंभर टक्के मतदान करावे.विवेकपूर्ण विचार करून स्वतः व इतरांना सुद्धा शत प्रतिशत मतदान करायला सांगावे.असे विनंतीपूर्ण आवाहन करीत आगामी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर-२०२४ रोजी घड्याळ या चिन्हा समोरील क्रमांक-४ चे बटन दाबून मला मतदान करीत लोकसेवेची संधी द्यावी,असे आवाहन करीत यावेळी आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी यावेळी रहाटगाव प्लॉट परिसरात ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.शिक्षणाच्या सामर्थ्याचा उपयोग सशक्तीकरणासाठी करण्यासाठी आपण काही तरी करायला हवं या अनुभवांतूनच विकासाच्या क्षेत्रात एक परिवर्तन दृष्टिकोन देण्यासाठी तसेच वंचित क्षेत्रातील तरुणांसाठी सक्रियपणे नेतृत्व विकसन करणारी,न्याय,समानता,सहानुभूती आणि एकता समृद्ध करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सामाजिक,आर्थिक परिवर्तनासाठी कल्याणकारी योजना व धोरणे राबविण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.व्यक्तिगत संपर्क,पाच वर्षीय कामाचा लेखाजोखा,बहुतांश सर्व आराखडे किंवा तांत्रिक बाबी या कुशल तज्ज्ञांकडून तयार करणे,मात्र प्रत्येक टप्प्यावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षणासाठी व त्यांना त्यामध्ये कुशल बनविण्यासाठी छोटया छोट्या प्रशिक्षणातून सुद्धा समाजातील अंतिम घटक विकसित झाला पाहिजे ही तळमळ,प्रामाणिकपणा,सर्वोत्कृष्टता आणि सेवा या मूल्यांप्रति कटीबद्धता,नागरिकांच्या प्रति सदैव आदर-सचोटी आणि विश्वासार्हता जपत जनसेवेची अहोरात्र तळमळ आदी बाबी लक्षात घेता, महायुतीच्या उमेदवार आ. सौ.सुलभाताई संजय खोडके यांचे या आशीर्वाद पदयात्रेचे निमित्ताने आगमन
प्रसंगी भुतेश्वर चौक-जनार्धनपेठ येथे त्यांचे स्थानिकांचे वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी’ फक्त सुलभाताईंची साद-त्यालाच आमचा भरभक्कम प्रतिसाद ‘ अशी भूमिका व्यक्त करीत आबालवृद्धांचा सहभाग या आशीर्वाद पदयात्रेच्या निमित्ताने मुख्य नवे आकर्षण ठरले होते.या आशीर्वाद पदयात्रेत रहाटगाव प्लॉट,-,रहाटगाव गांव,भुतेश्वर चौक,जनार्धन प्लॉट,चुना भट्टी,देशपांडे वाडी,प्रभात कॉलोनी,श्रीनाथ वाडी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक-युवतीं मोठया संख्येने सहभागी झाले होते.