LIVE STREAM

AmravatiMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024

शासकीय सोयाबीन खरेदीला ब्रेक, शेतकऱ्यांनी मांडल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात समस्या

अमरावती – नाफेड कडून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सदर खरेदी केंद्र तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली आहे। शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एका कार्यक्रमाच्या निमित्त अमरावतीत आगमन झालं होतं. त्याप्रसंगी अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरती शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध समस्यांचे निवेदन सोपवलं. खरीप हंगाम 2024 मध्ये सोयाबीन काढणी उरकलेली आहे. सोयाबीनचे बाजार भाव हे हमीभावाच्या तुलनेत कमी आहेत. 3500 ते 4300 दरम्यान हा हमीभाव असून 4892 स्थिरावला. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू केले होते. मात्र सदर केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तसेच व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी नाफेडचे शासकीय सोयाबीन केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी विविध शेतकरी व कंपन्यांच्या प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकरी विलास सोळंके, सचिन सोळंके, स्वप्निल तवर,  पवन बोडखे, वैभव झटाले,  सतीश मालवे, अजय चिंचोळकर, अंगद नन्हेर यांनी देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देखील दिल. फडणवीसांनी देखील शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेता यावर सकारात्मक असून तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!