LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर ; अमित शहांचं सूचक विधान .

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवारी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणारी रक्कम दीड हजारांवरुन २१०० रुपये करण्याचं, तरुणांना २५ लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलेलं आहे. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर अमित शहांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पण निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करु, असं सूचक विधान अमित शहांनी केलं. काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत बोलतानाही शहांनी असंच सूचक विधान केलं होतं. ‘मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचं सरकार आणायचं आणि फडणवीस यांना विजयी करायचं, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे’, असं शहा म्हणाले होते
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर अमित शहांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. यंदा आम्ही शरद पवारांना मुख्यमंत्री निवडण्याची संधी देणार नाही. पवारांना खोट्या कहाण्या रचण्याची सवय झाली आहे. पण यंदा त्यांच्या कहाण्या यशस्वी होणार नाहीत, अशी टीका शहांनी केली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट लक्ष्य करत आव्हान दिलं. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी वीर सावरकर यांच्यासाठी दोन बरे शब्द बोलू शकतात का, असं मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो,’ अशा शब्दांत शहांनी ठाकरेंवर तोफ डागली.
भाजपच्या संकल्पपत्रात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आहे. यासोबत शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यात २५ लाख नव्या नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिले जाणारे १५०० रुपये २१०० रुपये करण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला २ कोटीहून अधिक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!