एन.डी.आर.एफ. पथकाकडून विद्याथ्र्यांना आपत्तीविषयक विविध प्रकारांचे प्रशिक्षणआव्हान चान्सलर्स ब्रिागेड-2024
अमरावती (दि. 10.11.2024) –
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सुरु असलेल्या चॅन्सलर्स ब्रिगेड – 2024 आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील रा.से.यो. स्वयंसेवकांना सलग तिस-या दिवशी विविध आपत्ती विषयक पाठ¬क्रमातील विविध घटकांवर प्रशिक्षण देण्यात आले.
सकाळी सर्व विद्याथ्र्यासाठी एन. डी. आर. एफ. मार्फत फिझिकल फिटनेस व योगा घेण्यात आला. शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची सवय लागावी हा या सत्राचा विशेष उद्देश होता. विविध सत्रामध्ये आपत्ती या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाचे सखोल विश्लेषण करतांना वारंवार येणा-या आपत्तींपैकी काही नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात. आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पूर्व योजना यामध्ये संभाव्य धोक्यांचा आढावा घेऊन त्या धोक्यांची हानिकारकता आणि स्वरूप यांचा आढावा घेणे, धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, पूर्वतयारी करणे (सुसज्ज होणे), यांत सरकारी यंत्रणा, धोक्याचे इशारे देणारी यंत्रणा, आपत्तीदरम्यान लागणारी सामग्री, बिगरसरकारी यंत्रणा आणि सामान्य नागरिक या सर्वांच्या सुसज्जतेचा अंतर्भाव होतो, हे व्याख्यानाव्दारे विद्याथ्र्यांना पटवून देण्यात आले.
बी. एल. एस. बेसिक लाईफ सपोर्ट या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करताना एखाद्या दुर्घटनेमध्ये एखाद्या व्यक्तीचे अथवा बालकाचे ह्मदय पडले, त्याला श्वास घेता येत नसेल तर अशा वेळी काय उपाययोजना करावी, तसेच 5 ते 6 मिनिटात केला जाणारा उपचार कसा उपयुक्त ठरतो व बी. एल. एस. उपचार पद्धती कशी महत्वाची ठरते हे व्याख्यानातून पटवून देण्यात आले.
दुपारच्या सत्रात लिफ्टिंग अँड मुÏव्हग प्रात्यक्षिकामध्ये विविध प्रकारचे स्ट्रेचर्स तसेच सुधारित पद्धतीचे आपल्या अवतीभवती उपलब्ध असलेले संसाधन वापरून तयार करावयाच्या पद्धती व रुग्णाची उचल पद्धती यावर विविध प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले. चंद्रकेतू शर्मा, कृपाल मुळे, अजय यादव, ईश्वर मते, बिरेंद्र जैस्वाल, हरीश ढाकरे तसेच एन. डी. आर. एफ. पथकाने सर्व सत्रांच्या सुयोग्य संचालनाकरिता विशेष परिश्रम घेतले.