वस्तापूर मानकरी येथे आदिवासी मेळावाची १६१ वर्षाची परंपरा
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातपुड्यात वसलेले वस्तापूर मानकरी येथे बुधवार दि.६ ला या रोजी पांडवा पंचमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र मधील रेड्यांच्या टकरी व त्यांचे पूजन सजावट मैदानावर परंपरेगत पार पडत असे आदिवासीचे कुलदैवत बिरसा मुंडा व तपस्वी जाटू बाबा आदिवासीं यांच्या प्रतिमेचे पूजन फुलपुष्प वाहून सर्व समाज बांधवांनी उपस्थित पार पाडले त्यांनी आदिवासी साठी केलेल्या समाजकार्याचे महत्व आदिवासींना आजही या दिवसाच्या निमित्ताने स्मरणीय होते आदिवासी समाजाचा हा सर्वात महत्त्वाचा सण उत्सव मानला जातो स्नेह संमेलन भव्य हजारो च्या संख्येत सालाबाद मेळाव्याची वैशिष्ट आजही आदिवासी समाजात मुले मुली यात्रेच्या आदिवासी लग्नाच्या पारंपारिक वेशभूषा धारण करून मोठ्या संख्येने जमावाने सहभाग नोंदवितात व तरुण लग्नाच्या मुला मुलींच्या भेटीगाठी होतात घरी जाऊन मुली पाहणे आजही बदलत्या काळाच्या वेळेनुसार शक्य नाही याचाच अर्थ असा की भविष्याचा विचार करून सुमारे १६१ वर्षापूर्वीची परंपरेवर पहाळी मैदानावर रेड्यांच्या जंगी टकरा व मोठे यात्रा महोत्सव भरत होते पण न्यायालयाच्या आदेशाने रेड्यांच्या टकरीवर प्रशासनाने बंदी आलेली आहे रेड्यांच्या टकरा च का तर त्या मागचा उद्देश असा होता की रेड्याचं असा प्राणी आहे की ते एकमेकांना दिसतात टक्कर झुंज देतात दुसरे कारण असे होते यामागे पशुपालन करणे हाच हेतू तर या यात्रेचे पांडव पंचमीच का तर त्या दिवशी पांडव मैदानावर जिंकले होते आणि त्या दिवशी असे कार्यक्रम केले तर कोणत्याच प्रकारचे संकट विघ्न कार्यक्रमावर येत नाहीत ही आदिवासी ची कल्पना होती आणि ते आजही खरे ठरत आहे या मेळाव्यात हजारो आदिवासी महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेशातून आणि वऱ्हाडातून सुद्धा लोक सर्व समाज बांधव या आदिवासी पहाडी भागांमध्ये दोन दिवस अगोदरच यात्रेसाठी दाखल होतात कार्यक्रमाचे अध्यक्ष वंशपरंपरेनुसार संजय घिसू कासदे त्यांचे मित्र मंडळ सर्व आदिवासींचे गावकरी यात्रेमध्ये मोठ्या दिवाळी निमित्ताने सर्वांच्या लेखी बाई या यात्रेला हजेरी लावतात व दिवाळीचा मोठा आनंददायी कार्यक्रम ते पार पाडतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिराम कसबे व प्रास्ताविक भास्कर गुरुजी हे मोठ्या जबाबदारीने पार पाडतात,