आ. सौ. सुलभाताई खोडके यांची जनआशीर्वाद यात्रा महेंद्र कॉलनी -नवीन कॉटन मार्केट परिसर
मुलभूत विकास व मानवविकासाची सांगड घालून शाश्वत विकासाला बळकटी देण्यावर भर..
महेंद्र कॉलनी-नवीन कॉटन मार्केट प्रभागातील प्रचारयात्रेत महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांचा जनतेशी थेट संवाद..
महायुती समर्थकांच्या अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनात घड्याळ चा बोलबाला..
अमरावती १२ नोव्हेंबर :- समाजास सुखावणाऱ्या काही भौतिक विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी मला जे मतदानरुपी आशिर्वाद दिले,माझ्यावर जो विश्वास दर्शविलेला आहे.त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.आता भविष्यात सुद्धा शहरात विकासकामांचे पूर्ततेसाठी आपण सर्वांनी आगामी २० नोव्हेंबर-२०२४ रोजी मला आपले बहुमूल्य मते देऊन लोकसेवेची संधी द्यावी.असे विनंतीपूर्ण आवाहन करीत महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी मतदारांशी संवाद साधला.
अमरावती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई (आठवले गट ) , पीरिपा व मित्र पक्ष, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांच्या प्रचारार्थ स्थानिक महेंद्र कॉलनी -नवीन कॉटन मार्केट प्रभागातून भव्य जनाशीर्वाद यात्रा काढण्यात आली. सकाळच्या सत्रात नवीन कॉटन मार्केट भागातील लक्ष्मी नगर, सरस्वती नगर , शोभा नगर भागात तब्बल चार तास पायदळ भ्रमण करून महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके थेट -भेट थेट संवादातून जनतेचे आशीर्वाद घेतले. तसेच आगामी निवडणुकीत घड्याळ या चिन्हाचे बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले. शहराचे आरोग्य हे त्याच्या समृद्धीचा पाया असतो,असा दृढ विश्वास व्यक्त करीत शहराची निरोगी जनता ही त्या शहराची वृद्धी,उत्पादकता आणि नाविन्यपूर्ण कल्पना यामध्ये योगदान देण्यासाठी अधिक सक्षम असते.याकडे जनसामान्यांचे लक्ष वेधून आपण सर्वसमावेशक ,सुलभ आणि सर्वांची काळजी घेणारी अशी आरोग्यसेवा व्यवस्था निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत,असा निर्धार यावेळी महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला. तसेच सायंकाळच्या सत्रात महेंद्र कॉलनी स्थित राम मंदिर येथून झंझावाती अशा जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. ढोल ताश्यांच्या गजरात , फटाक्याच्या अतिशबाजीत, वारे घड्याळ चा नारा देऊन महायुतीच्या समर्थकांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान न्यु हनुमान नगर, खरैय्या नगर,अमर नगर, महेंद्र कॉलनी,पांढरी हनुमान मंदिर परिसर आदी भागातील नागरिकांच्या घरी जाऊन सुलभाताईंनी त्यांच्याशी संवाद साधून आशीर्वाद घेतले.सर्व नागरिकांना विशेषतः सर्वाधिक दुरबल घटकांतील व्यक्तींना समन्यायी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,असे त्यांनी विविध ठिकाणी जाऊन जनआशीर्वाद पदयात्रेत तसेच बैठकीत व गृहभेटीतून नागरिकांशी हितगुज करतांना सांगितले.
सर्वसामान्य माणसाची गरज लक्षात घेता शाश्वत विकास करतांना रस्त्यांचे जाळे,पायाभूत सेवा व सुविधांचा विकास,शहरीकरणाच्या योजनांसाठी तंत्रज्ञानाची मदत,प्रकल्पांची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन,उद्योग,व्यवसाय आणि रहिवासी क्षेत्रांचा विकास,पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आदींसह अन्य बाबी बघता सौ.सुलभाताई खोडके यांनी शहर विकासाला गती दिली आहे.त्यांच्या कार्यकाळात शहर विकास व सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवांचा विस्तार , क्रीडा सुविधा, शैक्षणिक विकासाला चालना मिळाली असल्याने अमरावतीचा विकास केवळ सुलभाताईच करू शकतात. त्यामुळे या निवडणुकीत जनता सुलभाताईंच्या पाठीशी असल्याचा प्रत्यय महेंद्र कॉलनीतील पदयात्रेतून घडून आला. अभूतपूर्व जनाशीर्वाद यात्रेत महायुतीच्या सर्व घटकपक्षातील कार्यकर्ते व सहकारी सहभागी झाल्याने यावेळी घड्याळ चा बोलबाला दिसून आला