कॅम्प परिसर लाल बंगला येथे डॉ. सुनील देशमुख यांची जाहीर सभा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महानगरपालिकेत प्रशासक काळात प्रचंड भ्रष्टाचार याला जबाबदार कोण याचा नागरिकांनी शोध घ्यावा- डॉ.सुनील देशमुख
कॅम्प परिसरातील लाल बंगला येथे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.सुनील देशमुख यांच्या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी मंचावर काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे,श्री. पुजदेकर,सुजताताई झाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांमध्ये अमरावती शहराची मोठी दुरावस्था झालेली आहे. अमरावतीकर नागरिकांवर मोठ्या प्रमाणात वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादण्यात आला होताआला होता. आणि निवडणुकांच्या तोंडावर आता त्याला स्थगिती देण्यात आली आहे परंतु मुळात हा अन्याय कर जनतेवर लादला का होता आणि तो आता रद्द का करत नाही हा खरा सवाल असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत तथा विरोधी पक्षनेते मनपा श्री बबलू शेखावत यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. संपूर्ण शहरात साफसफाईचा पुरता बोजवारा उडालेला आहे. संपूर्ण महापालिका डबघाईस आणलेले असून प्रशासकांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार महानगरपालिकेत भूक लागल्यामुळे महापालिका पूर्ती दिवाळखोरीच्या वाटेवर असून ही लूट कुणाच्या आशीर्वादाने झाली याचा सुद्धा अमरावतीच्या सुधार नागरिकांनी विचार करावा असा कटाक्ष डॉ.सुनील देशमुख यांनी आपल्या संबोधनातून केलाअसून. संपूर्ण महापालिकेत अनागोंदी माजलेली आहे.
गेल्या महिन्याभरात शहरात तब्बल सात ते आठ खून झालेले असून अजून वर्ष संपायचे आहे तरी गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून या विषयावर लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढायला तयार नाहीत अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेत परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे हे अपयश आहे नागरिकांच्या जीवनाच्या सुरक्षिततेच्या इतक्या महत्त्वाच्या विषयावर साधी बैठक घेण्याचे सौजन्यही लोकप्रतिनिधी दाखवलेले नाही. अमरावती शहराच्या नागरिकांचे जीवन अत्यंत असुरक्षित झाल्याचे प्रामुख्याने नमूद करून निर्भय अमरावती करिता मी तुमच्यासमोर उभा असल्याचे आवर्जून सांगितले.
अमरावती शहराचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विकास पूर्वीच्या काळात आपण केल्याचे नमूद करत अमरावती शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आयआरडीपी योजने अंतर्गत करण्यात आले होते तिथे पुढे एक टप्पा जाऊन शहरातील सर्व मुख्य रस्त्यांचे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांचे कायमस्वरूपी काँक्रीटीकरण केल्यामुळे भविष्यात नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते कायमस्वरूपी आपण उपलब्ध करून दिल्याचे सुद्धा नमूद केले. त्याचप्रमाणे अमरावती शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना टप्पा दोन पूर्णत्वास, इंटिग्रेटेड पावर डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत विद्युतीकरणाचे भक्कम जाळे मुख्य रस्त्यांवरील विद्युत तारा अंडरग्राउंड करणे आणि सब स्टेशनची दर्जा उन्नती करण्याचे काम सुद्धा गेल्या काळात आपण पूर्ण केल्याचे आवर्जून नमूद केले. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्री आयएस कोचिंग सेंटर ची इमारत विदर्भ महाविद्यालयाचे परिसरात रुक्मिणी नगर येथील विद्यापीठाच्या जागेवर अद्यावत अभ्यासिका ज्याला ज्ञान स्त्रोत केंद्र म्हणतात हे सुद्धा कार्यान्वित झालेले आहे. जेव्हा जेव्हा नागरिकांनी आपल्याला संधी दिली त्या त्यावेळी आपण त्यांनी दिलेला संधीचं विकासाच्या माध्यमातून सोनं करण्याचे पूर्ण प्रयत्न केला असून याही पुढे अमरावती शहराचे झालेली दुरावस्था सुधारून अमरावती शहराला गतवैभव मिळवण्याकरिता नागरिकांचे प्रचंड जन समर्थन विविध ठिकाणी निघणारा पदयात्रांमध्ये व जाहीर सभांमध्ये मिळणाऱ्या पाठिंबातील व्यक्त होत असल्याचे नमूद करीत माझ्या उमेदवारीला नागरिकांनी समर्थन करावेकरावे असे आवाहन डॉ. सुनील देशमुख यांनी केले