पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित
अमरावती (दि. 12.11.2024)-
वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा येथे 07 ते 11 डिसेंबर, 2024 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल (महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
चमूमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. शिमा गुरीजंग, कु. श्रिया थापा मंगर, कु. मोनिका कडू न कु. मिस्केन सुब्बा, मुंगसाजी महाराज शारीरिक शिक्षण महाविद्यालय, दारव्हाची कु. ऋतुजा चव्हाण, कु. प्रेमा मेश्राम व कु. वैष्णवी पवार, स्व. बी.एस.महाविद्यालय, साखरखेडाची कु. साक्षी सिरसाट, कु. दीपशिखा हिवाळे व कु. साक्षी हिवाळे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. सोलो मई, कु. जिल्लचिगरी क्मे डी. मोमीन, कु. रेमा गुरुना, कु. फेलिसीया स्वेर व कु. थायम्मेर्इंग बकोर एल.मावनाई, लढ्ढड फार्मसी महाविद्यालय, येलगांवची कु. ऐ·ार्या उबरहांडे, श्रीमती व्ही.एन. महिला महाविद्यालय, पुसदची कु. आयेशा खराटे व कु. धनश्री जाधव, दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळची कु. पूर्वा बोदईकर, इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगांवची कु. मंजिरी ठोंबरे, जी.एस.टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारची कु. सलोनी कोरे, डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातूरची कु. मुक्ता कवाडे, श्रीमती आर.डी.जी. महिला महाविद्यालय, अकोलाची कु. सविता नेमाडे, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची कु. साक्षी कौसकर, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची कु. पायल चंदेले यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
चमूचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 25 नोव्हेंबर ते 04 डिसेंबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.