विद्यापीठाचे आव्हान चान्सलर्स ब्रिागेड-2024 शिबीर
सर्पदंश, उण, वादळ, अतिवृष्टीपासून घ्यावयाची दक्षता व व्यवस्थापन विषयी विद्याथ्र्यांना मिळाले धडे
अमरावती (दि. 12.11.2024)-
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या विद्याथ्र्यांसाठी घेण्यात येत असून कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना विद्याथ्र्यांना तोंड देता आले पाहीजे, त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी तयार झाले पाहीजे, या उद्देशाने काठीण्य पातळीचे आपत्ती व्यवस्थापन शिबीरात विद्याथ्र्यांना धडे मिळत आहे. एन.डी.आर.एफ. चे तज्ज्ञ विद्याथ्र्यांना प्रशिक्षण देत आहेत.
पहिल्या सत्रातील व्याख्यानामध्ये सर्पदंश, प्राणीदंश व प्रथमोपचार या विषयावर मार्गदर्शन करताना सापांच्या सर्व जाती व त्याचे वर्गीकरण यावर विस्तृत माहिती देण्यात आली. त्यात विषारी, बिनविषारी व निम विषारी सापांची ओळख, महाराष्ट्रात व भारतात आढळून येणा-या सापांमध्ये नाग, फुरसे, घोणस व मण्यार हे प्रमुख विषारी साप असून यापासून होणारे सर्पदंश, व त्यामुळे होणारे मृत्यू, सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत, प्रथमोपचारादरम्यान घ्यावयाची काळजी, झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुणे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर देणे, पायी चालणे, दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप देवू नये आदीबाबंत शिक्षण देण्यात आले.
सापाचे विष मंत्राने उतरत नाही. दंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे न नेता तात्काळ दावाखान्यात न्यावे, सर्पदंशावर प्रतिसर्प विष हे एकमेव औषध आहे. अशा विविध बाबी तसेच सापांविषयी असलेले समज – गैरसमज विद्याथ्र्यांना शिबीरात पटवून देण्यात आले. सोबतच मधमाशी, श्वान व इतर कीटक यांच्या दंशाने होणारे अपाय व त्यावर उपचार यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. मेघ गर्जनेसह वादळ, विजांचा कडकडाट व मुसळधार पाऊस, गारा पडू शकतात, वादळाची माहिती व बचावाच्या प्रक्रिया, तसेच ढगफुटी, ढगफुटीसदृश्य पाऊस या विषयावर एन. डी. आर. एफ. चमूने प्रात्यक्षिकासह प्रकाश टाकला.
दुपारच्या सत्रामध्ये उष्णतेची, थंडीची लाट या विषयावर सादर करण्यात आलेल्या माहितीपट व पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उष्णतामान हे कमाल तापमानापेक्षा 45 डिग्री पेक्षा जास्त तीन दिवस सतत असणे म्हणजे उष्णतेची लाट. तसेच चोवीस तासामध्ये तापमानात अत्यंत घसरण होणे व ती काही काळापर्यंत टिकणे म्हणजे थंडीची लाट, यामुळे होणारे मृत्य, परिणाम व दुष्परिणाम याविषयी चर्चा करुन अद्ययावत माहिती देण्यात आली.
चक्रीवादळ हे अत्यंत कमी दाब असलेले क्षेत्र असते, यामध्ये वादळाच्या केंद्रातून दाब वाढत जातो. दबावाचे प्रमाण त्याच्या केंद्रामध्ये कमी कमी होत जाते व बाहेरील वादळाची तीव्रता, हवेचा वेग अधिक वाढत जातो. समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणा-या हवेमुळे बनणारे वादळ म्हणजे चक्रीवादळ होय. महाराष्ट्रातील काही भाग हा प्रामुख्याने अशा प्रकारच्या वादळामुळे प्रभावित होतो व यामुळे जीवितहानी तसेच वित्तहानी होत असते. अशा प्रकारच्या वादळापासून बचावासाठी वादळाचा अंदाज घेऊन व यंत्रणा सज्ज ठेऊन होणा-या नुकसानीची तीव्रता कमी करणे, वित्तहानी व जीवितहानी टाळणे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती एन. डी. आर. एफ. च्या तज्ज्ञ प्रशिक्षकांव्दारे विद्याथ्र्यांना देण्यात आली. त्याचबरोबर सर्व विषयांवर सराव व प्रात्यक्षित घेण्यात आले.