समविचारी पक्ष व सामाजिक संघटनांनी दर्शविली महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांना साथ
एकता ऑटो युनियन , महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक सेवा समिती अमरावती, स्वकुळ साळी संस्था यांचा जाहीर पाठिंबा..
महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांचा प्रचार करून निवडून आणण्याचा केला ठाम निर्धार..
अमरावती १२ नोव्हेंबर :- अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना,रिपाई (आठवले गट ) , पीरिपा व मित्र पक्ष, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांना सर्वसमाज घटक, समविचारी पक्ष व संघटनांची भक्कमपणे साथ लाभत आहे. जनतेशीसंवाद साधण्यासाठी , भेट व आशीर्वाद घेण्यासाठी सुलभाताई खोडके यांनी अभूतपूर्व अशी जनआशीर्वाद यात्रा सुरु केल्याने त्यांनी प्रचारातही प्रचंड अशी आघाडी घेतली असल्याने त्यांची बाजू अधिक मजबूत झाली आहे. गतकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि आगामी काळात अमरावतीच्या विकासाला नवी दिशा व गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके अमरावतीच्या निवडणुकीत पुन्हा उभ्या ठाकल्या असून त्यांना या निवडुकीतही जनतेची साथ,विश्वास व आशीर्वाद लाभत असून सर्वसमावेशक जनतेची त्यांच्या उमेदवारीला भरपूर पसंती मिळत आहे. अशातच विदर्भ ऑटो चालक-मालक फेडरेशन द्वारा संचालित एकता ऑटो युनियन शेंगाव नाका अमरावतीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता रत्नदीप श्रीधरराव बागडे यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे अध्यक्ष निलेश मेश्राम, उपाध्यक्ष नितीन बिसने, कार्याध्यक्ष दिनेश शेंडे ,सचिव अतुल वानखडे आदीसह पदाधिकारी व सदस्यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. त्याचबरोबर महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक सेवा समिती अमरावतीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांच्या घड्याळ या चिन्हाला आपली पूर्ण साथ असून त्यांचा प्रचार करून निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा निर्धार जाहीर पाठींब्याच्या पत्रातून व्यक्त करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्रसिंह राजकुमार, उपाध्यक्ष निलेशसिंह सेंगर ,सचिव साकेत सिसोदिया, कोषाध्यक्ष नरेंद्रसिंह चंदेल आदींसह कार्यकारणी सदस्य यांनीसुलभाताईंच्या उमेदवारीचे समर्थन करून आपण त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास व्यक्त दर्शविला आहे. तसेच स्वकुळ साळी समाज बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. सुलभाताईंनी शहरात पायाभूत सुविधांची निर्मिती करून अमरावतीचा कायापालट केला आहे. लोक कल्याण कार्य योजना केंद्राची असो, किंवा राज्याची असो ती अधिकाधिक पद्धतीने राबवून मतदार संघातील जनतेची सोय करून दिली आहे. त्यांची विशालदृष्टिकोन व कार्य करण्याची तत्परता पाहून पुढील पाच वर्षातही अशीच कामे होत राहो, हि भावना व विश्वास व्यक्त करीत असल्याचे सुद्धा संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंब्याच्या पत्रातून अधोरेखित करण्यात आले आहे. यावेळी स्वकुळ साळी समाज बहुउद्देशीय संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गलांडे, अध्यक्ष सुनील धमाले, सचिव विनोद विखार, कोषाध्यक्ष अरुण गजघणे,उपाध्यक्ष सदानंद खापरे आदींसह पदाधिकारी व सर्व कार्यकारणी सदस्य आदी उपस्थित होते.