LIVE STREAM

TeosaVidhan Sabha Election 2024

यशोमती ठाकूर यांची गावोगावी पदयात्रा, नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी , साधला संवाद

अमरावती ( प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर ह्या गावोगावी प्रचार पदयात्रा काढून नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. या भेटीदरम्यान त्यांच्याशी संवाद साधून निवडणुकीमध्ये आपल्या कामाच्या आधारावर निवडून देण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान प्रत्येक गावात यशोमती ठाकूर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तिवसा मतदार संघातील महा विकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावात जाऊन आपला प्रचार सुरू ठेवला आहे. मतदार संघातील गावोगावी भेट देऊन त्या नागरिकांशी संवाद साधत चर्चा करत आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असल्याने आता काही दिवस शिल्लक राहिले असल्याने ठाकूर यांचा प्रचार जोमात सुरू आहे. त्यांना सर्वच गावात मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विरोधकांनी या मतदारसंघात कोणताही विकास न केल्याने व संपर्क न ठेवल्याने त्यांना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यशोमती ठाकूर यांचे कामच त्यांच्या विजयाचे गुपित ठरेल असे चित्र संपूर्ण मतदारसंघात दिसून येते. शासनाच्या विविध योजना राबवून जिल्हया सोबतच तिवसा तालुक्यात यशोमतींनी केलेला विकास सर्वश्रुत आहे. येणाऱ्या काळात यशोमती ठाकूर यांना मोठी जबाबदारी मिळणार असून त्या आणखीन आपल्या मतदारसंघात विकास करतील असा विश्वास नागरिकांना असल्यानेच ते यशोमतींना समर्थन देताना दिसत आहे. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला आपण पुढे नेले पाहिजे याकरिता नागरिकांनी यशोमती ठाकूर यांच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात समर्थन दिल्याचे दिसून येते. आज शिंदोळा बुद्रुक, फत्तेपूर,शिवणगाव, शेंदुरा धसकट, सालोरा ,धोत्रा ,वऱ्हा शेंदुर्जना बाजार, तळेगाव ठाकूर या गावातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली. सर्वच परिसरातून नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत यशोमती ठाकूर यांना समर्थन दिले.

सर्वाधिक अत्याचार महायुतीच्या काळात

महायुतीने अडीच वर्षाच्या काळात शेतकरी व गोरगरिबांची क्रूर थट्टा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरभरून साथ देण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी प्रचारादरम्यान जनतेला केले. संविधान विरोधी सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, जातीपातीत तेढ निर्माण करून राजकीय नेत्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे मत देखील यशोमती ठाकूर यांनी प्रचार सभेत व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांच्या काळात राज्यातील जनतेवर सर्वाधिक अत्याचार महायुती सरकारच्या काळात झाला असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी प्रचार सभेत केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!