LIVE STREAM

TeosaVidhan Sabha Election 2024

“वंचित बहुजन आघाडीच्या मोझरी येथील जंगी प्रचार सभेमुळे विरोधकांच्या पोटात भितीचा वायूगोळा व मिलिंदजी तायडे यांचे पारडे जड झाले”

सोमवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी दोन वाजता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मिलिंदजी तायडे यांची प्रचारसभा मोझरी उपस्थितीत पार पडली. ह्या सभेला हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी उसळली होती.. विशेष म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकुर यांचे मोझरी हे जन्मगाव असताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीची मोझरी येथे सभा दणक्यात पार पडली…
हि सभा होऊ नये म्हणून विरोधकांनी पडद्याआड खुप प्रयत्न केले… होते…सोशल मीडियामध्ये विरोधकांनी अफवा पसरवून संभ्रम निर्माण केला होता पण … वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते व मतदारांनी विरोधकांचा डाव असफल केला व हजारो लोकांनी उपस्थिती दर्शविली..या जंगी सभेमुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिलींदजी तायडे व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे..व विरोधकांच्या पोटात भितीचा वायुगोळा तयार झाला व मिलींजी तायडे यांचे पारडे जड झाले.. “सभेमध्ये धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष भिमराव कोरटकर यांनी मिलींदजी तायडे यांना जाहीर पाठिंबा दिला.”
बाळासाहेब आंबेडकर यांची नुकतीच एन्जीओप्लास्टी झाली आहे. जालना येथे त्यांचे हेलिकॉप्टर लॅंड होऊ शकले नाही व पुढील दौरा करण्यासाठी विलंब झाला असता..त्यामुळे संयोजकांनी बाळासाहेब आंबेडकर यांना दगदग व धावपळ होऊ नये म्हणून मोझरी येथे येऊ नये अशी विनंती केली होती… बाळासाहेब आंबेडकर यांनी मोबाइलवर भाषण व संदेश दिला व तो संदेश ध्वनीक्षेपण करून उपस्थित असलेल्या मतदार जनतेला ऐकवण्यात आला.. बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दलित आदिवासी आरक्षणाच्या वर्गीकरण व क्रिमी लेयर बाबतच्या निकालाचे कांग्रेस व बिजेपी ह्या दोन्ही आघाड्यांनी स्वागत व समर्थन केले आहे त्यामुळे सरकार व विरोधी पक्षांचे भुमिकेमुळे दलित आदिवासी समाजाच्या आरक्षण धोक्यात आले आहे असे सांगितले..
तिवसा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे तडफदार व लढाऊ उमेदवार मिलिंदजी तायडे यांनी वयाच्या २१ व्या वर्षी राजकारणात पदार्पण केले. शिराळा गाव ग्रामपंचायत सदस्य, नंतर उपसरपंच व नंतर सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती , खरेदी विक्री संघ अमरावती डायरेक्टर असा त्यांचा राजकिय आलेख उंचावत गेला. मिलिंदजी तायडे हे तरुणपणापासुन आंबेडकरी विचारांच्या लढाईत सक्रिय आहेत… त्यांच्या रुपाने फुले शाहू आंबेडकरी विचारांचा सच्चा शिपाई तिवसा विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे त्यामुळे मतदारसंघात परीवर्तनवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे…
सभेमध्ये अनेक वक्त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एससी एसटी आरक्षणाच्या वर्गीकरण व क्रिमी लेयर बाबतच्या निकालानंतर एससी एसटी आरक्षण धोक्यात आले आहे तसेच ओबीसी आरक्षण सुध्दा धोक्यात आले आहे..महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील १६-१७ टक्के असलेल्या मुस्लिम समाजातील एकाही व्यक्तीला गेल्या लोकसभा निवडणुकीत तसेच राज्यसभेचे व विधानपरिषदेचे सुध्दा तिकीट दिले नाही त्यामुळे मुस्लिम समाजाचे राजकीय अस्तित्व सुध्दा धोक्यात आले आहे. त्यामुळे सर्व शोषित वंचित पिडीत बहुजन समाजाचे मतदारांनी तिवसा विधानसभा मतदारसंघातुन प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले..या जंगी सभेमुळे मिलिंदजी तायडे यांचा विजय सोपा झाला आहे….
सभेचे सुत्रसंचलन एड.महेंद्रभाऊ तायडे यांनी केले. सभेला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मिलिंदजी तायडे, अमरावती जिल्हा अध्यक्ष व अमरावती उमेदवार राहुलभाऊ मेश्राम, सभेचे अध्यक्ष आनंदराव इंगळे (उपाध्यक्ष), भोई समाजाच्या प्रतिनिधी शिलाताई पारीसे, बालारावजी गायकवाड, धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष भिमरावजी कोरटकर, सागर भोवते (युवक आघाडी), नंदकुमार खंडारे (उपाध्यक्ष), मिलींदभाऊ वानखडे (सामाजिक कार्यकर्ते), प्राजक्ताताई पिल्लेवान (युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष), संदिपभाऊ दहाट (अध्यक्ष तिवसा शहर), नंदकुमार तायडे (माजी तिवसा अध्यक्ष), संजुभाऊ कापडे (माजी सचिव अमरावती),रविंद्रभाऊ कुमार कडु (पुसदा सर्कल प्रमुख), रघुनाथ मनोहर (नांदगाव पेठ सर्कल प्रमुख),राहुलभाऊ भालेराव (माजी तालुका अध्यक्ष), सचिनभाऊ जोगे (तिवसा तालुका युवक अध्यक्ष),मयुरभाऊ इंगळे (अमरावती तालुका युवक आघाडी), अविनाशभाऊ कडु,एड.किरणताई यावले, अरूणभाऊ कडु,चंदुभाऊ थोरात,धाकडे सर, संगिता तायडे,अनिलभाऊ तायडे,अनिल बादसे, सारंग पाटील, मिलिंद वानखडे, महाविर ढेंबरे व पंडित ढेंबरे अमरावती, धनराज मोहोड मुंबई (वंचित बहुजन आघाडी सोशल मिडिया सेल) व मतदारसंघातील अनेक मान्यवर व हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते…..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!