विलास नगर-रमाबाई आंबेडकर नगरात गाजला सुलभाताई खोडके यांच्यासाठी जनसामान्यांचा विजयी भवचा नारा
सर्वसामान्य गोर-गरीब जनतेला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक जनकल्याणकारी योजना राबविण्यात येतात. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा तसेच आर्थिक स्वावलंबन निर्माण होऊन समाजात व कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत झाली आहे. अमरावतीमध्ये रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून हजारो घरकुले पूर्ण झाले असून गरिबांना त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले . संजय गांधी निराधार योजना , श्रवणबाळ योजनेच्या माध्यमातून निराधार व वृद्धांना मोठा आधार मिळाला आहे. यासह अनुसूचित जाती-जमाती,मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, दिव्यांग बांधव व महिला वर्ग यांचे आर्थिक व सामाजिक उत्थानाकरीता कार्यान्वित विविध लाभांच्या योजनांची सुद्धा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. आगामी काळातही फुले-शाहू -आंबेडकरांच्या विचारधारेला अनुसरून सामाजिक न्यायाची संकल्पना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचा मनोदय विद्यमान आमदार तसेच महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला.
अमरावती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना , रिपाई (आठवले गट ) , पीरिपा व मित्र पक्ष, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांच्या प्रचार जनआशीर्वाद यात्रेने चांगलाच जोर धरला आहे. सुलभाताई खोडके यांनी प्रचारात दमदार अशी आघाडी घेतल्याने सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हाचा बोलबाला दिसत आहे. याच शृंखलेत मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी महायुतीच्या उमेदवार आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी विलासनगर, म्हाडा कॉलनी, सिद्धी विनायक नगर, रमाबाई आंबेडकर नगर, आदर्श हाऊसिंग सोसायटी, लिंबोनिया सोसायटी, आदी भागात झंझावती अशी पदयात्रा केली. या पदयात्रेत महायुती मध्ये सहभागी घटकपक्ष व समविचारी संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते, सहकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या तुफानी पदयात्रेतून सुलभाताईंनी संपूर्ण परिसर पायदळी पिंजून काढून स्थानिक भागातील जनतेचे आशीर्वाद घेतले. दरम्यान सुलभाताईंचे औक्षण, स्वागत तसेच सत्कार करण्यासाठी स्थानिक भागातील महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दरम्यान सुलभाताईंनी विविध धार्मिकस्थळांच्या ठिकाणी भेट देऊन सुद्धा देवी-देवता व महान विभूतींना अभिवादन केले.
विलास नगर – रमाबाई आंबेडकर नगर आदी परिसर हा शहराच्या मध्यठीकाणी असून येथून सर्व सुविधा स्थानिक नागरिकांना सहज उपलब्ध होतात. आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून डफरीन-इर्विन सुपर हॉस्पिटल येथे चांगल्या आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुविधेयुक्त शैक्षणिक विकास व भौतिक सुख-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुल येथे आधुनिक खेळ , मैदान विकास व क्रीडा सुविधांचा विस्तार करण्यात आला. दर्जेदार रस्ते निर्मितीतून सुरक्षित प्रवास, परिवहन व दळणवळणाला अधिक चालना मिळाली आहे. आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या अमरावती विधानसभेतील पाच वर्षाच्या काळामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याने अमरावतीचा सर्वांगीण विकास केवळ सुलभाताईच करू शकतात. असा एकसुर पदयात्रेतून उमटला असल्याने आमची सुलभाताईंनाच साथ राहणार असल्याची भावना जनसामान्यांमध्ये व्यक्त होत होती.
दरम्यान महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद करीत येत्या बुधवार दिनांक २० नोव्हेंबर – २०२४ रोजी होणाऱ्या अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडुकीत प्रचंड मताधिक्याने मला विजयी करण्याचे आवाहन या पदयात्रेत त्यांनी यावेळी जनसामान्यांना केले. यावेळी वारे घड्याळ आली रे घड्याळ.. महायुतीचा विजय असो.. सुलभाताई खोडके तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है . च्या गजराने स्थानिक विलासनगर, म्हाडा कॉलनी, सिद्धी विनायक नगर, रमाबाई आंबेडकर नगर, आदर्श हाऊसिंग सोसायटी, लिंबोनिया सोसायटी,आदी परिसर दणाणून केला होता.