कठोरा रोड कॉलनी परिसर येथे डॉ.सुनील देशमुख यांच्या पदयात्रेला नागरिकांची साथ
दूरदृष्टी ठेवून केलेला अमरावतीचा शाश्वत विकास यालाच मिळेल अमरावतीकरांची साथ – डॉ.सुनील देशमुख
महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांची प्रचार पदयात्रा आज रंगोली लॉन कठोरा रोड परिसर येथील विविध नागरी वस्त्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांचा या पदयात्रेला प्रचंड पाठिंबा व समर्थन मिळाले. ठिकठिकाणी डॉ.सुनील देशमुख यांचे औक्षवंत करून मातृशक्ती व पितृ शक्तीने त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.
डॉ.सुनील देशमुख यांनी अमरावती शहराचा केलेला शाश्वत विकास सर्वच क्षेत्रांमध्ये असले त्यांचे उल्लेखनीय योगदान याला नागरिकांची मोठी साथ मिळत असल्याचे या पदयात्रांमधून प्रतीत झाले. पदयात्रेमध्ये डॉ सुनील देशमुख यांचे समवेत शिवसेना नेते प्रदीप बाजड शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे, विजय वानखडे, रवींद्र इंगोले, अर्चनाताई इंगोले,राहुल साबळे, बबलू भुयार , सौरभ बेलसरे यांचे सह मोठ्या प्रमाणात युवक सामील झाले होते. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक ही मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले.
अमरावती शहराची गेल्या पाच वर्षात सर्व क्षेत्रांमध्ये मोठी पीछेहाट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सबंध शहरांमध्ये एकही नाविन्यपूर्ण प्रकल्प सोडाच परंतु आधीच मंजूर केलेल्या प्रकल्पांना सुद्धा विद्यमान लोकप्रतिनिधी चालना देऊ शकलेले नाहीत पाच वर्ष काही न करता निवडणुकांच्या तोंडावर जनतेला आम्हीच म्हणून मोठ्या प्रमाणावर विकास कामांच्या घोषणा व जिथे तिथे फलक लावून केलेले भूमिपूजन हेच काय तर उपलब्ध आणि आपण खूप काही केल्याचा जो अविर्भाव आहे तो नागरिकांचा आता चांगल्याच लक्षात आलेला आहे. उघड्या डोळ्यांनी दिसेल व सांगता येईल असे एकही काम विद्यमान लोकप्रतिनिधी करू शकलेले नाही हे खरी शोकांतिका आहे. अमरावती महापालिका त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासक काळात करण्यात आलेला भ्रष्टाचार यामुळे महापालिका भूके कंगाल झालेली असून. शासनातर्फे महापालिकेसाठी विशेष अनुदान आणणे तर दूरच उलट शासनाच्या इतर प्रकल्पांमध्ये महापालिकेला जोड अनुदान म्हणून द्यावयाचे कोट्यावधी रुपयांचा महापालिकेवर लादण्याचे काम गेल्या काळात करण्यात आलेले आहे. भ्रष्टाचाराने आधीच डब्गाईस आलेली महापालिका नदारीच्या वाटेवर आलेली आहे. याचा परिणाम साफसफाई सारख्या मूलभूत बाबींवर खर्च करण्यासाठी सुद्धा महापालिकेकडे पैसा नाही परिणामी गेल्या सहा महिन्यापासून शहरातील स्वच्छता साफसफाई याचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. आणि लोकप्रतिनिधी यावर सकार शब्दही बोलायला तयार नाही. अमरावती शहराची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेली एक महत्त्वपूर्ण यंत्रणा महापालिका कोलमडलेल्या अवस्थेत असून शहरात सर्व दूर अस्वच्छतेचा माहोल तयार झालेला आहे. यामुळे हे अपयश लपवण्यासाठीच मोठ मोठ्या घोषणा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात पाहिजे आणि फ्लेक्स बाजी शहरात करण्यात येत आहे ही नागरिकांच्या डोळ्यात शुद्ध धूळफेक करण्याचा प्रकार असून जनतेच्या ही बाब आता चांगलीच लक्षात आलेली आहे. या कारणाने शहरातील प्रशासन महापालिका रूडावर आणावयाची असेल तर डॉक्टर सुनील देशमुख यांचे शिवाय पर्याय नसल्याचे आता सर्वत्र बोलल्या जात आहे. व पदयात्रांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे प्रकर्षाने लक्षात सुद्धा येत आहे. त्यामुळे डॉक्टर सुनील देशमुख यांचा विजय या निवडणुकीत निश्चित होईल याबद्दल जनता सुद्धा आता आश्वस्त असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.