पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल (पुरुष) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित
अमरावती (दि. 15.11.2024 ) – पारूल विद्यापीठ, वडोदरा (गुजरात) येथे 16 ते 22 डिसेंबर, 2024 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल (पुरुष) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
चमूमध्ये जिजामाता महाविद्यालय, बुलडाणाचा किरण राऊत, मुंगसाजी महाविद्यालय, दारव्हाचा प्रज्योत तायडे, ओम काशीकर व शुभम राठोड, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा राज मिश्रा, मॉर्विन मोसेस, सोनम तामंग, बासिल लिम्बो, ऋषिकेश खंडारे, झैकेसातूओ केट्स, अभिषेक राज, पोंगुसा सोनो, इंदिरा महाविद्यालय, राळेगांवचा यश यादव व अभिषेक बुटके, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा फैजान खान, सम्यक चिंचखेडे व फैजल शेख, दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळचा शंतनू निंगुरकर, डॉ. आर.जी.आय. तंत्रशिक्षण व संशोधन, अमरावतीचा सार्थक इंगोले, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीचा सिध्दार्थ भोयर, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोलाचा शेख मोहंमद अर्श, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा निखिल गोंडे व प्रबल बोने, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा रोमान खान व तनवीर अहेमद यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
चमूचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 04 ते 13 डिसेंबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.