LIVE STREAM

AmravatiEducation NewsLatest NewsLocal News

आव्हान चान्सलर्स ब्रिागेड-2024 शिबीराचा उत्साहवर्धक वातावरणात समारोप

आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने जागरूक असावे – जिल्हाधिकारी

अमरावती – (दि. 16.11.2024)  विद्यार्थी जागरूक झाल्यास आपत्ती व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकते, जीवीतहानी टाळल्या जावू शकते, यासाठी प्रत्येकाने जागरूक असावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांनी केले. गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘आव्हान – 2024’ चान्सलर्स ब्रिागेड या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराच्या दहा दिवसीय शिबीराचा शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी अतिशय उत्साहवर्धक अशा वातावरणात समारोप झाला, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, एन.डी.आर.एफ. पुणे येथील असिस्टंट कमांडन्ट जस्टीन जोसेफ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. विद्या शर्मा, प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, राज्यपाल नामित समिती सदस्य डॉ. रामे·ार कोठावळे, संजय कवळे, डॉ. मल्लिकार्जुन  करजगी, डॉ. रमेश राजेश लिमसे, मो. शकिल अ. करीम, डॉ. शाम खंडारे, रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू उपस्थित होते.
                  जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन हे स्थानिक पातळीवरच झाले पाहिजे. शासनाचे विशेष लक्ष यासाठी राहीले आहे. कारण भौगोलिकदृष्ट¬ा आपत्तीचे प्रकारही असतात. आसाममध्ये आलेल्या चक्रीवादळाने जी हानी झाली होती, त्यानंतर तेथील स्थानिक पातळीवरच आपत्ती निवारणाचे कार्य नागरिकांनी केले व आता कोणत्याही आपत्तीला ते समर्थपणे तोंड देत आहेत. त्यामुळे जिल्हा, तालुका, गांव पातळीवर प्राधान्याने आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करुन त्यात स्थानिकांना स्थान द्यावे, जेणेकरुन त्या त्या ठिकाणच्या आपत्तीप्रसंगी नागरिकच निवारण्यासाठी सक्षम ठरतील.
                   एन.डी.आर.एफ. चे असिस्टंट कमांडन्ट जस्टीन जोसेफ म्हणाले, 2001 च्या भूकंप, त्सुनामी, ओरीसा चक्रीवादळ या आपत्तीनंतर एन.डी.आर.एफ. ची स्थापना कायद्यानुसार झाली. देशभरात 16 बटालीयन असून राज्यपालांच्या प्रेरणेने विद्याथ्र्यांना आपत्तींचा सामना करण्याचे व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरातून दिल्या गेले. प्रशिक्षित विद्यार्थी आमच्या नेहमी संपर्कात राहून भविष्यात होणा-या आपत्तीसाठी आम्हाला मदत करतील, असे त्यांनी आवाहन केले.
                    व्य.प. सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी मनोगतात म्हणाले, आपत्ती पूर्व व्यवस्थापनासाठी विद्याथ्र्यांना प्रशिक्षण मिळावे व ते तयार व्हावेत, यासाठी राज्यपाल महोदयांनी आव्हान स्पर्धा सुरु केली. या शिबीरात ज्या विद्याथ्र्यांनी प्रशिक्षण घेतले, त्यांनी आपल्या भागातील विद्याथ्र्यांना प्रशिक्षित करावे तसेच मानवनिर्मित आपत्तीचे व्यवस्थापन सुध्दा करावे, असेही ते म्हणाले.
                     कु. उत्कर्षा कोल्हे, पुणे विद्यापीठ, गजानन जोशी, नांदेड विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे प्रा. गोरखनाथ कीर्दक, डॉ. सुनिता तेलसिंगे,  एन.डी.आर.एफ. चे इ·ार मते, आव्हान समितीचे रामे·ार कोठावडे, मल्लिकार्जुन करजगी यांनी मनोगत व्यक्त केले.

समाज आणि राष्ट्रहिताकरीता एन.डी.आर.एफ.चे महत्वपूर्ण कार्य – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते                      एन.डी.आर.एफ. करीत असलेले कार्य समाज आणि राष्ट्रहिताकरीता अत्यंत महत्वपूर्ण असे कार्य असल्याचे मत अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी व्यक्त केले. शिबीरात प्रशिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्यांनी कोणत्याही आपत्तीप्रसंगी प्रशासनाला सहकार्य करावे. आपले महाविद्यालय, आपले शेजारी यांनाही आपत्ती प्रसंगी आपले मदतकार्य केले पाहिजे. एकत्र आल्यानंतर मैत्रीसंबंधही निर्माण होतात, त्यामुळे हे मैत्रीसंबंध असेच पुढेही कायम ठेवावे. या दहा दिवसीय शिबीराचे अतिशय उत्कृष्टरित्या आणि सूक्ष्म पध्दतीने नियोजन केल्याबद्दल आयोजन समितीचे त्यांनी अभिनंदन केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला बेस्ट कॉन्टीजेन्ट ट्रॉफी 

 बेस्ट कॉन्टीजेन्ट ट्रॉफीचा सन्मान सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला मिळाला. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या चमूंसह चमू व्यवस्थापकांनी हा मान स्वीकारला. तर बेस्ट कॉन्टीजेन्ट लिडर रोटेटिंगची ट्रॉफी डॉ. सुरेश बी. पाटील, मुंबई विद्यापीठ आणि डॉ. ज्योती वाकोडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर मराठवाडा विद्यापीठ, जळगांवला मिळाला. बेस्ट एन.एस.एस. स्वयंसेवक रोटेटिंगची ट्रॉफी चेतनकुमार यादव, मुंबई, दादाजी किनकर, बामू, संभाजीनगर, कु. मानसी अग्रवाल, मुंबई व कु. ऐ·ार्या पाटील, पुणे विद्यापीठ  तर बेस्ट प्रोसेशन रोटेटिंग ट्रॉफीचा बहुमान गोंडवाना विद्यापीठाला मिळाला. मान्यवरांच्या हस्ते स्वयंसेवक विद्यार्थी व चमू व्यवस्थापक यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
                        याप्रसंगी एन.डी.आर.एफ. चमू. विविध विद्यापीठांमधील चमू व्यवस्थापक, विविध समिती, उपसमितींचे सदस्य, कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणा-या विद्यापीठातील अधिकारी, कर्मचा-यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
                         राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत व आव्हान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत तर प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, सूत्रसंचालन डॉ. सोनल कामे, तर आभार रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, एन.डी.आर.एफ. पुणे येथील चमू, महाराष्ट्र राज्याच्या 23 विद्यापीठांमधील रा.से.यो. स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

पुढील वर्षी आव्हान स्पर्धाचे यजमानपद पी.के.व्ही. ला   

  पुढील वर्षी होणा-या आव्हान स्पर्धेचे यजमानपद अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला प्राप्त झालं आहे. तशी घोषणा समारोपप्रसंगी करण्यात येऊन ध्वज संबंधितांना हस्तांतरीत करण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!