कपिल वस्तू नगरसोबतचा ऋणानुबंध अविरतपणे जोपासत राहू- महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके
पदयात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद करून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन
ताश्यांचा गजर,पुष्पांचा वर्षाव, अतिशबाजीत सुलभाताईंचे कपिल वस्तू नगरात जंगी स्वागत
अमरावती १६ नोव्हेंबर :- आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कपिल वस्तू नगरवासियांची भरभरून साथ लाभली. सामाजिक जीवनात सक्रिय असतांना स्थानिक नागरिकांशी चांगला ऋणानुबंध निर्माण झाला आहे. येथील सामाजिक कार्यप्रसंग, धार्मिक उत्सव व महोत्सवाच्या निमित्ताने मी अनेकदा या भागात आलेली आहे. त्यामुळे येथील सर्व लोक माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. जनतेने हाच आशीर्वाद कायम ठेवावा, एक दिवस माझ्यासाठी द्या, पाच वर्ष मी तुमच्यासाठी देईन. असे सांगून महायुतीच्या उमेदवार आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी येत्या काळात कपिलवस्तू नगराचा कायापालट करण्याचा मनोदय व्यक्त केला.
अमरावती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीच्या उमेदवार आ.सौ. सुलभाताई खोडके यांची मागील एक महिन्यापासून आरंभिलेल्या झंझावती अशी जनआशीर्वाद यात्रा कपिलवस्तू नगरात पोहोचली. यावेळी स्थानिक भागात सुलभाताईंचे ढोल-ताश्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिशबाजीत तसेच पुष्पांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान आद्यक्रांतिवीर वस्ताद लहूजी साळवे यांच्या २३० व्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात सुलभाताईंनी वीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करून समस्त अनुयायांना जयंतीदिनाच्या हार्दिक शुभेछ्या दिल्या.
अमरावती विधान सभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीकडुन राष्ट्र्वादी कॉंग्रेस पार्टी कडुन घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. महायुती मध्ये भाजपा शिवसेना शिंदे गट , रिपाई आठवले व प्रा.जोगेंद्र कवाडे साहेबांचा पिरीपा पक्ष असे मित्र पक्ष सहभागी आहे. तसेच लहूजी शक्ती सेना सुद्धा महायुती मध्ये सामील आहे. त्यामुळे माझी बाजू ही अधिक भक्कम झाली आहे. मातंग समाजाचे न्याय हिताचे रक्षण करण्यासाठी आपण कटीबद्ध असून त्यांच्या सामाजिक,आर्थिक विकासाकरिता कार्यान्वित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ च्या माध्यमातून समाज बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच मातंग समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी नुकतीच आर्टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ,स्थापन करण्यात आली आहे. आर्टी चे अमरावती येथे विभागीय केंद्र स्थापन करून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता, निवासी वसतीगृह, संगणक कक्ष, प्रशिक्षण वर्ग अशा प्रकारची व्यवस्था करणे आपल्या मुख्य अजेंड्यावर आहे. असे मनोगत सुद्धा महायुतीच्या उमेदवार आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी माझी लाडकी बहीण योजना ही यशस्वी व लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे येत्या बुधवार दिनांक २० नोव्हेंबर ला मतदानासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून घड्याळ च्या चिन्हा समोरील बटन क्रमांक ४ दाबून विजयी करा. निवडून येताच माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान १,५०० वरून २,१०० करणे हेच माझे प्रथम कर्तव्य राहणार असल्याची ग्वाही सुलभाताई खोडके यांनी दिली. यावेळी स्थानिक भागातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकळाट करून सुलभाताईंनाच आपली साथ दर्शविली. यावेळी “वारे घड्याळ आली रे घड्याळ ” सुलभाताई खोडके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.