अंबागेट – जवाहर गेट भागातील तुफानी महापदयात्रेतून सौ.सुलभाताई खोडके यांच्या विजयाचा शंखनाद
अमरावतीला प्रगत, उन्नत व समृद्ध करण्यासाठी सुलभाताई खोडके यांनी मांडले ” मिशन व्हिजन “
रस्ते विकास,आरोग्य, शिक्षण, क्रीडा सेवांचा विस्तार, शहर विकास व पर्यटनाला चालना
जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताईं खोडके यांची प्रचारात दमदार आघाडी
अमरावती १७ नोव्हेंबर :- एकच आस.. एकच ध्यास , अमरावती नगरीचा सर्वांगीण विकास. गेल्या पाच वर्षापसून अमरावतीकर जनता विकासाचे पर्व अनुभवत आहे. अमरावती शहराच्या विकासाला गतिमान व बळकटी देण्यासह नवी दिशा देण्यासाठी आगामी विकासाची दूरदृष्टी बाळगून नियोजित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मूलभूत विकास व मानवविकास यांची सांगड घालून विकसित व प्रगतिशील अमरावतीचा संकल्प करून शहराला नवा लौकिक व आयाम देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. यासाठी मिशन व्हिजन अंतर्गत अमरावतीला प्रगत, उन्नत व समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी दिली.
अमरावती मतदार संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई खोडके यांनी अंबागेट- जवाहर गेट भागात अभूतपूर्व अशी महापदयात्रा केली. या विशाल पदयात्रेमध्ये तमाम सुलभाताई समर्थक, स्नेहीजण, लाडक्या बहिणी, युवक बांधव तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सह्भागी होऊन सौ. सुलभाताई खोडके यांनाच साथ दर्शविली. यावेळी महायुतीचा विजय असो, सुलभाताई खोडके तुम आगे बढो.. वारे घड्याळ,आली रे घड्याळ..कहो दिलसे .. सुलभाताई फिर से .. अशा गगनभेदी घोषणा देऊन सौ. सुलभाताई खोडके यांच्या विजयाचा शंखनाद करण्यात आला. या महापदयात्रेमधे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, रिपाई आठवले गट, पीरिपा कवाडे, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, अखिल भारतीय मराठा महासंघ, लहुजी शक्ती सेना, जय मल्हार क्रांती संघटना, दलित पँथर, युनायटेड रिपब्लिकन पार्टी व मित्र पक्ष तसेच समविचारी संघटनांचे नेते , पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने शिवशक्ती-भीमशक्ती-कमलशक्तीचे अभूतपूर्व दर्शन घडवून आले.
ढोल ताश्यांचा गजर, पुष्पवृष्टी, आतिषबाजी व विजयी भव च्या गर्जनेमध्ये निघालेल्या या अभूतपूर्व जनाआशीर्वाद यात्रेमध्ये महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी मतदारांशी भेट,संवाद व आशीर्वाद घेऊन येत्या बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी घड्याळ या चिन्हासमोरील बटण क्रमांक – ४ दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान सुलभाताईंनी आपल्या पाचवर्षाच्या आमदारकीच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन आगामी विकासाचे व्हिजन सुद्धा मांडले.
अमरावती महानगर पालिकेच्या वतीने वर्ष २०२३-२०२४ पासून अंमलात आणलेल्या नवीन मालमत्ता कर आकारणी व वसुलीला शासनाच्या वतीने स्थगिती देण्यात आली आता शहरातील मालमत्ताधारकांना जुन्याच पद्धतीने घर टॅक्स पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील ९० हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच
अमरावती शहराला आगामी पन्नास वर्ष पर्यंत नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना ८६५.२६ कोटींची निविदा मंजूर करून कामाला सुरुवात झाली आहे. मुबलक पाणी पुरवठ्यातून अमरावतीला जलसंजीवनी मिळाली आहे. गेल्या पाच वर्षात अमरावती विधानसभा मतदार संघात विविध विकास कामे व योजनांकरीता ३,२७५ कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे ज्यामध्ये रस्ते विकास व पायाभूत सुविधांची निर्मिती-७४२ कोटी, पाणी पुरवठा व वितरण योजना-१,००० कोटी, इमारती बांधकामे-७१९ कोटी, शैक्षणिक विकासाच्या सुविधा (सारथी केंद्र सह अन्य शैक्षणिक सुविधा )-२६३ कोटी, क्रीडा सुविधांची निर्मिती-८२ कोटी, आरोग्य सेवा सुविधा व विस्तार- १९६ कोटी, आवास योज़ना-१९० कोटी, चौकांचे सौंदर्यीकरण- ७ कोटी, पर्यटन विकास- २७ कोटी, महावितरण सुविधांची कामे- ४९ कोटी आदींचा समावेश असल्याची माहिती आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या प्रचार पत्रकातून मतदारांसमक्ष सादर केली. तसेच आगामी विकासाचा नियोजित कृती कार्यक्रम व व्हिजन मांडतांना जनतेच्या अपेक्षेनुरूप
शासकीय संस्थांचे जतन व विकास करून त्या ठिकाणी चांगल्या भौतिक सुविधा, किमान कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण व संशोधन संस्था चे विभागीय केंद्र अमरावतीत स्थापन करण्यात येईल, तसेच शासकीय संस्थांच्या विस्तीर्ण नैसर्गिक परिसरात पर्यावरण पूरक बॉटनिकल गार्डन आदी कामे करण्यात येणार आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या सेवा सुविधा व विस्तार , क्रीडा स्टेडियम येथे खेळाचे मैदान विकसित करून क्रीडा प्रशिक्षण, सराव व स्पर्धांच्या आयोजनाकरिता विभागीय क्रीडा संकुल -जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येईल . धार्मिक स्थळांचा विकास व त्याठिकाणी पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यावर देखील भर राहणार आहे. तसेच उद्योगाकरिता नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील भारत डायनामिक्स प्रकल्प मार्गी लावणार असून यासाठी स्टँम्प ड्युटीवर राज्य शासनाची सवलत मिळण्यासाठी आगामी काळात पाठपुरावा करण्यात येईल, टेक्स्टाईल पार्क मध्ये गारमेंट झोन स्थापन करून तेथे नवीन अत्याधुनिक मशीन तसेच कामगारांना प्रशिक्षण देवून अमरावतीत गारमेंटची मोठी बाजारपेठ उपलब्ध करून स्थानिक भूमिपुत्राला रोजगाराच्या भरमसाठ संधी उपलब्ध करून देण्याचा मानस सुद्धा महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला. यासह वडाळी तलाव व बांबु गार्डन दोन्ही मिळून पर्यटन स्थळ साकारून अमरावतीमध्ये सुद्धा सुंदर, हरित व स्वच्छ तसेच पर्यावरण पूरक उद्यान साकारण्याचा आपला मानस आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली शिवटेकडीचा एक रम्यनीय पर्यटकीय स्थळ म्ह्णून विकास करून शिवसृष्टीचे सौंदर्य जगासमोर आणण्याचा आपला संकल्प देखील सुलभाताईंनी व्यक्त केला. आगामी काळात अमरावती (बेलोरा ) विमानतळावरून लवकरच ७२ प्रवासी सेवा व नाईट लँडिंग सेवा, इलेक्ट्रिक बस सुविधा, जेष्ठ नागरिकांसाठी महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र.हेल्पलाईन कक्ष व समाज विकास केंद्र स्थापन करून समुपदेशन व मार्गदर्शनाची सुविधा करण्यात येणार आहे. असा आपला जाहीरनामा सुद्धा महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी प्रचारातून जाहीर केला.
अमरावतीच्या विकासाला सौ. सुलभाताई खोडकेंचं दिशा व गती देऊ शकत असल्याने व त्यांची खऱ्या अर्थाने अमरावतीचा कायापालट केला , म्ह्णून अमरावतीचा विकास केवळ सुलभाताईच करू शकतात ही जाणीव ठेवून स्थानिक भागातील नागरिकांनी सुलभाताईंच्या घड्याळ या चिन्हाला आपली साथ दर्शविली. अंबागेट-जवाहर गेट परिसरातील पदयात्रेला सर्वसमावेशक जनतेची बहुमोल साथ लाभल्याने सर्वत्र घड्याळ ची टिक-टिक दिसून आली.आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी प्रचारात दमदार आघाडी घेऊन विजयाचा शंखनाद झाला आहे.
बॉक्स :- अंबागेट- जवाहर गेट मध्ये आलं सुलभाताई नावाचं विकासाचं वादळ
महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या जनाशीर्वाद यात्रेला गांधी चौक वाहनतळ येथून दुपारी चार वाजता सुरुवात झाली. दरम्यान गांधी चौक, अंबागेट , पटवीपूरा ,माताखिडकी श्रीकृष्ण मंदिर , महाजनपूरा गेट , कोंडवाडी ते माळीपूरा ,भाजी बाजार ते मुरलीधर मंदिर , दहिसाथ चौक ते नया खोलापुरी गेट, बजरंग चौक ते निळकंठ चौक, आझाद चौक ते पंचशील चौक,सीताराम बिल्डिंग ते मुर्गेंद्र मठ, इंद्रभुवन थेटर ते सातखिराडी,दहीसात ते रतन भवन गणेश मंदिर , मच्छिसाथ, धनराज लाइन ते सक्करसाथ चौक , रंगारी गल्ली ते कैची वाली गल्ली ,जवाहर गेट नानकराम दहिवडा, छत्रपुरी मैदान आदी भागातून सुलभाताईंनी भ्रमण करून मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी विजयी भव… विजयी भव.. चा स्वर सर्वत्र निनादत होता. त्यामुळे अमरावतीच्या विकासासाठ सुलभाताईच वादळं आलंय असे चित्र दिसून आले होते.