महायुतीच्या उमेदवार आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा लेखा-जोखा
नम्र निवेदन,
सर्व अमरावतीकर मतदार बंधू आणि भगिनींनो,
सस्नेह नमस्कार
महिला शक्तीचे एक रूप गृहिणी सुद्धा आहे. गृहिणी म्हटले की घरकाम, कुटुंबाचा सांभाळ व जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपला संसार सुखी व समृद्ध करणे, अशी सर्वसाधारण धारणा आहे. पण एका गृहिणीला जर पती,परिवार व आपल्या सहकाऱ्यांची बहुमोल साथ मिळाली, पाठबळ मिळाले तर ती काहीही करू शकते.
शेतकरी कुटुंबातील मुलगी व सून असून कुठलाही राजकीय वारसा नसतांना केवळ पती संजय खोडके यांना राजकीय क्षेत्रात असलेली आवड त्यामुळे सहकार क्षेत्रातून महिला बँकेच्या संचालक पदापासून सुरु झालेली वाटचाल आज महाराष्ट्र विधानसभा सदस्य पर्यंत पोहोचली आहे.
मागील २५ वर्षापासून आजपर्यंत अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेची अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांचे कुटुंब सक्षम होईल, पर्यायाने राज्य व देशही सक्षम होण्यास मदत होईल, असेच वाटत असल्याने महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला. शोध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतांना महिला बचत गट प्रदर्शनी व महामेळावा,सांस्कृतिक महोत्सव, जेष्ठ नागरीक सत्कार सोहळा आदी उपक्रमातून समाजऋण चुकविण्याची संधी मिळाली. जी महिला गृहिणी होती, राजकारण कळत नव्हते, त्याच महिलेने ध्येयवादी होऊन ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करीत आपल्या माणसांनप्रती काही देणं लागते, ही भावना मनी बाळगून वर्ष २००४ मध्ये पहिल्यांदा बडनेरा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवित प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला.
याच काळात विदर्भ विकास पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. वर्ष २००९ व वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदार संघाचे विभाजन झाल्याने मला पराभवाचा सामना करावा लागला.
आयुष्यात सहजतेने काहीच मिळत नाही.संघर्ष-प्रयत्न करावेच लागतात. प्रत्येक संकटांचा सामना करावा लागतो, यात स्वतःवरील निष्ठा व विचारधारा महत्वाची असते. कधीही संस्कार व संस्कृती सोडू नये, विचारांशी तडजोड मान्य नसून लढणे हाच आपला बाणा आहे.
व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून परिवाराची मिळालेली साथ, पती संजय खोडके मंत्रालयात असल्याने जनविकासाची कामे करण्याची धडपड व त्यात सर्व सहकाऱ्यांचे मिळालेले पाठबळ या विश्वासाच्या जोरावर वर्ष २०१९ मध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. व आपण सर्वानी पुन्हा आमदार म्हणून निवडून देत काम करण्याची संधी दिली. दोन वर्षाचा काळ कोरोना -लॉकडाऊन मध्ये गेला. अशा परिस्थितीत जनजीवन विस्कळीत होवून लोकांची आर्थिक घडी मोडकडीस येत असतांना अमरावती शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी व अर्थचक्राला गती देण्यासाठी, आरोग्य सुविधांच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळे आपण सर्व कोरोना महामारीवर मात करू शकलो. नंतर आपल्या समोर अनेक आव्हाने उभी असतांना निवडणूक पूर्व काळात केलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हे माझे प्रथम कर्तव्य होते.
विकासाच्या संकल्पनेत मुलभूत विकास व मानव विकास साधण्यासाठी आपण विकासाचा नियोजित कृती कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी शृंखलाबद्ध पद्धतीने विकास कामांची मालिकाच राबविण्यावर भर दिला. सर्वसामान्यांकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे दृष्टिकोणातून तसेच अमरावती शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा याकरिता अधिकाधिक निधी आणण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नांची मालिकाच राबवून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडून अमरावतीच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करून आणला. ज्यामध्ये गेल्या पाच वर्षात
रस्ते विकास व पायाभूत सुविधांची निर्मिती-७४२ कोटी,पाणी पुरवठा व वितरण योजना-१,००० कोटी, इमारती बांधकामे-७१९ कोटी, शैक्षणिक विकासाच्या सुविधा (सारथी केंद्र सह अन्य शैक्षणिक सुविधा )- २६३ कोटी, क्रीडा सुविधांची निर्मिती-८२ कोटी, आरोग्य सेवा सुविधा व विस्तार- १९६ कोटी, आवास योज़ना-१९० कोटी, चौकांचे सौंदर्यीकरण- ७ कोटी , पर्यटन विकास- २७ कोटी, महावितरण सुविधांची कामे-४९ कोटी. अशी जवळपास ३,२७५ कोटींच्या विकास योजनांची कामे करण्यात आली आहे. विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी व प्रत्येक समाज घटकाला विकासाच्या प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रभागा-प्रभागात पायाभूत सुविधांची विकास कामे पूर्णत्वास आल्याने अमरावतीच्या विकासाचे चक्र अधिक गतिमान झाले आहे.
अमरावती शहरात विकासाचे पर्व नांदत असतांना यामध्ये आपल्या सर्वांची मोलाची साथ व आशीर्वाद लाभले आहेत. यातूनच मिळालेली उर्जा व धाडस तसेच गेल्या पाच वर्षात आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदा होवू घातलेली वर्ष २०२४ ची अमरावती विधानसभा निवडणूक मी लढवीत आहे. आगामी विकासाची दूरदृष्टी बाळगून नियोजित कृती कार्यक्रम सुद्धा तयार करण्यात आला आहे. या निवडणुकीतही आपल्या सर्वांची साथ, विश्वास व मतदानरुपी आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहील,एवढीच अपेक्षा व्यक्त करीत आहे.
स्नेहांकित
सौ. सुलभा संजय खोडके.
आमदार, अमरावती. तथा महायुती उमेदवार
अमरावतीकरांना वाढीव मालमत्ताकरातून मोठा दिलासा. सन २०२४ मधील वाढीव मालमत्ता कर आकारणी व वसुलीस स्थगिती. अमरावती महानगर पालिकेच्या वतीने वर्ष २०२३-२०२४ पासून अंमलात आणलेल्या नवीन मालमत्ता कर आकारणी व वसुलीला शासनाच्या वतीने स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या सह सचिव विद्या हम्पय्या यांनी ५ सप्टेंबर २०२४ रोजी पत्र काढून “अमरावती मनपा आयुक्त तथा प्रशासक यांना उपरोक्त विषयान्वये संदर्भीय श्रीमती सुलभा संजय खोडके मा. विधानससभा सदस्य यांच्या पत्राच्या अनुषंगाने स्थगिती देण्यात येत आहे” असे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरातील मालमत्ताधारकांना जुन्याच पद्धतीने घर टॅक्स पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या ८६५.२६ कोटीची निविदा मंजूर
अमरावतीकरांना वर्ष २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेल इतक्या मुबलक व नियमित पाणी पुरवठ्याची दूरदृष्टी ठेवून अमृत-२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना ८६५.२६ कोटींचा प्रकल्प मंजूर करून आणला आहे. गेल्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते जलशुद्धीकरण केंद्र तपोवन येथे योजनेच्या कामाचे उदघाटन करण्यात आले आहे. कामास प्रारंभ.
अमरावती विधानसभा मतदार संघात मागील पाच वर्षातील विकास कामे
( एकूण ३,२७५ कोटींची विकास कामे )
१) रस्ते विकास व पायाभूत सुविधांची निर्मिती- ७४२ कोटी
२) पाणी पुरवठा व वितरण योजना- १,००० कोटी
३) इमारती बांधकामे- ७१९ कोटी
४) शैक्षणिक विकासाच्या सुविधा ( सारथी केंद्र सह अन्य शैक्षणिक सुविधा )-२६३ कोटी.
५) विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक क्रीडा सुविधांची निर्मिती- ८२ कोटी
६) आरोग्य सेवा सुविधा व विस्तार- १९६ कोटी.
७) आवास योज़ना-१९०कोटी
८) चौकांचे सौंदर्यीकरण- ७ कोटी
९) पर्यटन विकास- २७ कोटी
१०) महावितरण सुविधांची कामे- ४९ कोटी
( शहरात तीन नवीन ३३ केव्ही उपकेंद्र )
राज्य विधिमंडळ कामकाजाचा लेखाजोखा..
( वर्ष २०१९ ते २०२४ पर्यंतच्या १४ व्या महाराष्ट्र विधानसभामध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातील आ. सौ. सुलभाताई खोडके जिल्ह्यातील आठ ही आमदारांच्या तुलनेत अव्वलस्थानी. सर्वाधिक ३४१ प्रश्न केले उपस्थित.)
*पाच वर्षात महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन १३
*अधिवेशन कामकाजाचे एकूण दिवस १३२
*अधिवेशन कामकाजात उपस्थिती व सहभाग १३२
*अधिवेशनात मांडलेले प्रश्न- ३४१
*व्हिजन विकासाचे…… गतिमान अमरावतीचे*
*मिशन व्हिजन*
अमरावती शहराच्या विकासाला गतिमान व बळकटी देण्यासह नवी दिशा देण्यासाठी आगामी विकासाची दूरदृष्टी बाळगून नियोजित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मूलभूत विकास व मानवविकास यांची सांगड घालून विकसित व प्रगतिशील अमरावतीचा संकल्प करून शहराला नवा लौकिक व आयाम देण्याचा प्रयत्न.
*शासकीय संस्थांचे जतन व विकास*
*जुने विदर्भ महाविद्यालय (व्हीएमव्ही ), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय , शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय , किमान कौशल्य प्रशिक्षण संस्था (आयटीआय ), यांचे जतन व संवर्धन करून चांगल्या शैक्षणीक व भौतिक सुविधा निर्माण करण्यावर भर राहणार.
* व्हीएमव्ही येथे पर्यावरणपूरक व ऑक्सीजनयुक्त विविध वनस्पती व वनौषधीनी नटलेले बॉटनिकल गार्डन साकारण्याच्या संकल्प.
*वर्क फ्रॉम टाऊन* :- अमरावती शहरामध्ये तंत्रशिक्षण व अभियांत्रिकेचे शिक्षण देणाऱ्या नामांकित शैक्षणिक संस्था व चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी देशातील नामांकित आयटी बिल्डिंग व तांत्रिक सामुग्री, पायाभूत सुविधा आदी उपलब्ध करून देऊन अमरावतीमधल्या स्थानिक उमेदवाराला आपल्या शहरातच कंपनीत काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम टाऊन सुरु करण्यासाठी कटीबद्ध.
आरोग्य सेवांचा विस्तार
* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती करीता निवडलेली जागा ही शहरापासून १० किलो मीटर दूर आहे. म्हणून रुग्णांना सोयीच्या दृष्टीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.
*जिल्हा सामान्य रुगणालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हायटेक व मल्टीस्पेशालिटी आरोग्य निर्माण करण्य.
उद्योग
*नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील भारत डायनामिक्स प्रकल्प मार्गी लावणार, यासाठी स्टँम्प ड्युटीवर राज्य शासनाची सवलत मिळण्यासाठी आगामी काळात पाठपुरावा.
*अमरावती नांदगाव पेठ एमआयडीसी येथील टेक्स्टाईल पार्क मध्ये गारमेंट झोन स्थापन करून मध्यम आणि लघु उद्योगांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न. यातून स्थानिक भूमिपुत्राला रोजगाराच्या भरमसाठ संधी.
*अमरावती (बेलोरा ) विमानतळावरून लवकरच ७२ प्रवासी सेवा व नाईट लँडिंग सेवा नजीकच्या काळात कार्यान्वित*.
इलेक्ट्रिक बस सुविधा – प्रदूषण विरहित प्रवासाच्या सुविधेसाठी अमरावती महापालिका क्षेत्रात धावणार इलेक्ट्रिक सिटीबस.
*पर्यटन विकास*
वडाळी तलाव व बांबु गार्डन दोन्ही मिळून पर्यटन स्थळ साकारणार :-
विशाखापट्टम येथील बॉटनीकल गार्डन प्रमाणे सुंदर, हरित व पर्यावरण पूरक उद्यान साकारण्याचा मानस
*शिवडेकडी (शिवसृष्टीचा विकास ):-* शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली शिवटेकडीचा एक रम्यनीय पर्यटकीय स्थळ म्ह्णून विकास करून शिवसृष्टीचे सौंदर्य जगासमोर आणण्याचा आपला संकल्प .
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण व संशोधन केंद्र :- सारथी अमरावती विभागीय केंद्रा प्रमाणेच मागासवर्गीयासाठी बार्टी, बहुजन समाजासाठी महाज्योती, आदिवासी विद्यार्थ्यासाठी टार्टी, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी अमृत, मातंग समाजासाठी आर्टी, अल्पसंख्यांकासाठी ‘एमआरटीआय’ आदी संस्थांचे अमरावती विभागीय केंद्र स्थापन करण्याचा मनोदय.
*अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथील क्रीडा सुविधांचा विस्तार*
विभागीय क्रीडा संकुलाला लागून असलेली महाराष्ट्र शासनाच्या मालमत्ता पत्रकानुसार शासनाची पेठ अमरावती सीट नंबर ३८ सी मधील ६९४६.१० चौरस मीटर जागा विभागीय क्रीडा संकुला करीता हस्तांतरित करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
*अमरावती येथे फुटबालचे सिंथेटिक मैदान.
*नदी जोड प्रकल्पामुळे उद्योगांना भरभराटी.
*वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील अमरावतीसह सहा जिल्ह्यातील अवर्षण प्रवर क्षेत्राकडे (दुष्काळी भाग) वळवून सिंचनाकरिता, पाणी पुरवठा व औद्योगिक वापरासाठी नदीजोड प्रकल्पाची आखणी.
*उद्योगाकरीता ३९७ द.ल.घ.मी. पाणी वापर आरक्षित असल्याने अमरावतीमधील उद्योगांना मोठ्या प्रमाणात भरभराट येईल.
*पाण्याच्या मुबलकतेमुळे औद्योगिक क्षेत्र विकसित होऊन मोठे उद्योग निर्माण करून अमरावतीत औद्योगिक हबसाठी मोठी संधी.
*हेल्पलाईन व सहाय्यता कक्ष*
रोजगार, स्वयंरोजगार, शासकीय माहिती, विविध लाभांच्या योजना, कर्ज योजना, अनुदान योजना,मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, गरीब व गरजू घटकांसाठी कार्यान्वित शासकीय योजनांची माहिती ही एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी अमरावती येथे एक हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्याची बाब मुख्य अजेंड्यावर.
समाज विकास केंद्र – शहराचे सामाजिक वातावरण व्यवस्थित राहण्यासाठी, तसेच नागरिकांना सुरक्षा, मार्गदर्शन व महिती साठी समाज विकास केंद्र स्थापन करून त्याठिकाणी समुपदेशकाची नियुक्ती.
*रुग्णसेवेबरोबरच रुग्णांना विविध आरोग्य विषयक योजना व सुविधांची माहिती.
*मुंबईसह अन्य महानगरात उपलब्ध अत्यावश्यक आरोग्य सुविधांसाठी २४ बाय ७ तत्पर सेवा व हेल्पलाईन. .
*महिला सुरक्षेच्या दृष्टीने शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा राहणार वॉच
जेष्ठ नागरिकांसाठी महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र.