श्री विठ्ठल रुख्मिनी रविदास मंदिर येथे महापूजा संपन्न
कार्तिक मासानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन
दिनांक: 16 नोव्हेंबर 2024: विदर्भाची पुरातन राजधानी, कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तीपीठ व माता रुख्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कार्तिक मासानिमित्य 16 नोव्हेंबर 2024 रोजी दहिहांडी सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने कौडण्यपुर येथे ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याच पार्श्वभूमीवर दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी श्री.विठ्ठल रुक्मिणी रवीदास मंदिर, कौंडण्यपूर येथे श्री. स्वप्निल रामभाऊ नासने मु. देऊरवाडा कौंडण्यपूर ह. मु दिल्ली यांच्या हस्ते सहपत्नीक महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर मंदिराचे सचिव श्री. सुनील हरीभाऊ तायडे(लक्ष्मी नगर अमरावती) यांच्या हस्ते श्री स्वप्निल रामभाऊ नासने व सौ श्रद्धा स्वप्निल नासने यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यानंतर दुपारी 2:30 ते 5:30 दरम्यान ह.भ.प. रमेशपंत खेरडे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर ची. ललित सुनील तायडे (लक्ष्मी नगर अमरावती), श्रीमती वत्सलाबाई हरिभाऊ तायडे ( लक्ष्मी नगर अमरावती ) सौ .कांता ताई सुधाकरराव नासने( सर्वोदय कॉलनी अमरावती ) श्रीमती.शालिनीताई यादवराव भागवते (बेला, नागपूर), यांच्यातर्फे आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. त्यानंतर सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान मंसागिर महाराज दिंडी (रसुलाबाद), व शेंदोळा बु. दिंडी यांचा सामूहिक भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. अशाप्रकारे या कार्तिकी सोहळ्यात दुरदूरवरून भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. महापूजेला मंदिराचे अध्यक्ष श्री. रामभाऊ .ल. नासने सौ. मालाताई .रा. नासने तसेच पुजारी श्री श्रीरामजी पुंडेकर, सौ. गौकर्णाताई श्रीरामजी पुंडेकर, श्री. मनोज रामभाऊ नासने, सौ .दिपाली मनोज नासने,श्री प्रमोदराव नासने, श्री दिनेश नाथे, युवराज नासने, अशोकराव नाते , चि. अंकुश श्री पुंडेकर, चि. अक्षय श्री पुंडेकर, सौ. मंगला पतके, श्रीमती. कुसुमबाई डाकोडे, श्रीमती. लिलाबाई मोकळे, सौ. योगिता डाकोडे, सौ. निवेदिता आशिषराव नवले, सौ पायल प्रतीक वासनकर (नागपूर) श्री. दिलीपराव हरिभाऊ नासने व सौ. ललिताबाई दिलीपराव नासने, श्री गोविंदरावजी बुंदिले , व इतर भाविक भक्त उपस्थित होते.