निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची पत्रकार परिषद
अमरावती, दि. 18 : मतदानापूर्वीचे 72 तास आधी करावयाची कार्यवाही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अल्प कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणांनी मतदान प्रक्रियेवर अधिक लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला पोलिस उपायुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, आज सायंकाळी सहा वाजल्यापासून जाहिर प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लागलेले होर्डींग काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच यानंतर जाहिर प्रचार थांबत असला तरी इतरप्रकारे प्रचार सुरू राहणार आहे. त्यामुळे फिरते आणि स्थिर पथकांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, आयकर, ड्राय डे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यामुळे निवडणूक शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पोलिस आयुक्त श्री. रेड्डी यांनी, दुकाने, हॉटेल वेळेवर बंद होण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. आज सायंकाळपासून आदेशाचे अंमलबजावणीस सुरूवात होईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. प्रामुख्याने मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात खासगी मालमत्तेवरीलही प्रचार साहित्य काढावे लागणार आहे. त्यामुळे याची विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहे. निवडणूक निरीक्षक श्री. पुनिया यांनी स्थिर आणि फिरते पथकांनी जबाबदारीने कार्यवाही करावी. प्रामुख्याने लक्ष द्यावयाच्या भागात विशेष काळजी घ्यावी. निवडणूक निरीक्षक बिधानचंद्र चौधरी यांनी मतदानापूर्वी गस्त वाढविणे गरजेचे आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात विशेष लक्ष देण्यात यावी, असे निर्देश दिले