*महाराष्ट्र ग्राम दर्पण व्दारा आयोजित एक दिवसीय जलसाक्षरता प्रशिक्षकांचे प्रशिक्षण*
*प्रशिक्षण व प्रशिक्षकाला येणाऱ्या समस्या या विषयावर सांगोपांग चर्चा*
दि. 15/11/2024 रोजी महाराष्ट्र ग्राम दर्पण व्दारा आयोजित एक दिवसीय जलसाक्षरता प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम ग्रीन पार्क, परसोडा, मार्डी रोड, अमरावती येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. रविराजजी देशमुख सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रा.श्री. डॉ. व्ही. टी. इंगोले सर यांची सुद्धा उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षकाचे प्रशिक्षण (ToT) या कार्यक्रमाला बहुसंख्येने प्रशिक्षक उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षकाची गुणवैशिष्टे कशी असावी व त्याची कार्यपद्धती या विषयावर जिल्हा परिषद अमरावती येथील मा. दिनेश गाडगे ( प्रवीण प्रशिक्षक ) यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून उपयुक्त व मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षकांना केले.
यानंतर महाराष्ट्र ग्राम दर्पण चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सुबोध देशमुख यांनी प्रशिक्षण व प्रशिक्षकाला येणाऱ्या समस्या या विषयावर सांगोपांग चर्चा केली. प्रशिक्षण निरंतर व प्रभावात्मक होण्यासाठीच्या उपाय योजनेचे महत्व त्यांनी विशद केले.
यानंतर प्रवीण प्रशिक्षक मा. श्री. प्रदिप निचळे, सौ. सीमा मोरे, कु. मेघा चौधरी, यांनी यथोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित मा. प्रा.श्री. डॉ.व्ही. टी. इंगोले यांनी पाण्याचे महत्व व सुरक्षीकता या करिता रेन वॉटर हारवेस्टिंग सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ग्रे वॉटर चे शूद्ध पाण्यात रूपांतरण या विषयी परिपूर्ण माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्र ग्राम दर्पण चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सरतेशेवटी प्रशिक्षकांना प्रमाणपत्रे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.