केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे सुलभाताईना विजयी करण्याचे आवाहन
महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांना विजयी करा-
भाजपा राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आवाहन…
अमरावती १९ नोव्हेंबर :- संपूर्ण देशात सुसज्य रस्त्याचे विक्रमी जाळे पसरविणारे विकासाचे भागीरथ भाजपा राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांनी एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई संजय खोडके यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. नामदार गडकरी म्हणाले की,श्री खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या विकासासाठी मोलाची कामगिरी केली आहे. यावेळी महाराष्ट्राच भविष्य बदलविण्याकरिता महायुतीच सरकार आलं पाहिजे. त्यामुळे आपली शक्ती आणि ताकद आपण सुलभाताईच्या पाठीशी उभी करा. अमरावती शहराचा व जिल्ह्याचा विकास केल्या शिवाय त्या राहणार नाही.. असा विश्वास देखील भाजपाचे राष्ट्रीय नेते ना. नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला आहे. अमरावती विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांना मतदान करून विजयी करा, असा पुंनर्रोच्चार करत आवाहन केलं आहे.
आ. सौ सुलभाताई खोडके यांना महायुती कडून अमरावती मतदार संघाची जागा मिळताच भाजपा पार्टी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. प्रचारात सहभागी असून सभा व बैठाकांचे आयोजन सुद्धा सुरु आहे. भाजपाचे राष्ट्रीय नेते ना. नितीनजी गडकरी यांनी विजयाचे आवाहन करीत आशीर्वाद दिल्या बद्धल महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी ना. नितीनजी गडकरी व भारतीय जनता पार्टी तसेच मित्र पक्षाचे आभार मानले आहे.