आपली मेहनत, सहकार्य व मतदाना बद्धल आभारी आहे-सौ. सुलभाताई खोडके

लोकशाहीच्या लोकोत्सवात सहभागी शासकीय यंत्रणा,पोलीस प्रशासनाचे मानले आभार..
महायुती-घटक पक्ष व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मतदान करणाऱ्या मतदारांप्रती व्यक्त केली कृतज्ञता..
अमरावती २१ नोव्हेंबर :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चे अनुषंगाने ३८-अमरावती विधानसभा मतदार संघाची निवडणूक काल बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात पार पडली, लोकशाहीच्या लोकोत्सवात सहभागी सर्व मतदार बांधव, शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच सर्व सहकारी बांधवांचे सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करीत मनापासून आभार मानले आहे.
अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एक उमेदवार म्ह्णून उभी असतांना गेल्या एका महिन्यापासून प्रचारासाठी महायुतीचे घटक पक्ष व सर्व सहकाऱ्यांनी अथक मेहनत व परिश्रम घेतले. यामध्ये सर्वसमावेशक जनतेची साथ, विश्वास व आशीर्वाद लाभले. समविचारी पक्ष व संघटना, संस्था व विविध समाजाच्या संघटनांनी जाहीर पाठिंबा देऊन प्रचारातही सहभाग घेतला. या सर्वांप्रती ऋणी राहणार असून आभार व्यक्त करीत असल्याची भावना सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली आहे. तसेच काल बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मतदान केले व सहकार्य केले त्याबद्दल सर्व सहकारी, महिला भगिनी, युवक बांधव,नव मतदार व सर्व नागरिकांचे सुद्धा सौ.सुलभाताई खोडके यांनी आभार मानले आहे.
अमरावती विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता गेल्या १५ ऑक्टोबर २०२४ रोजी लागू झाली. त्यानंतर लगेच निवडणुकीची अधिसूचना जारी करून कार्यक्रम घोषित झाला. राज्यात २० नोव्हेंबर या दिवशी मतदान होत असल्याने सर्व यंत्रणा कामाला लागली. आदर्श आंचार संहितेचे काटेकोरपणे पालन करून अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम व मतदान प्रक्रिया यशस्वी प्रक्रिया पार पाडून कर्तव्य बजावल्याबद्दल मतदान निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी व सर्व यंत्रणा, निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक तसेच मतदान केंद्र प्रमुख, व कर्मचारी, बीएलओ तसेच मतदार जनजागृती व मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने आयोजित स्वीप ( SVEEP) उपक्रमांच्या नोडल अधिकारी व स्वीप कक्षाचे कर्मचारी. या सर्वांचे सौ.सुलभाताई खोडके यांनी अमरावती विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार या नात्याने अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहे. तसेच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त, पोलीस पेट्रोलिंग,चेक पॉईंट, वाहतूक नियंत्रण व व्यवस्था अशा सर्व बाबींवर योग्य पद्धतीने काम करून अमरावती विधानसभा मतदार संघाची निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यात आली. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे सुद्धा सौ. सुलभाताई खोडके यांनी आभार मानले आहे.
काम करत आलोय.. काम करत राहू- सुलभाताईंचा मनोदय…
अमरावती विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने आपण काम करत आहे. आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेने विश्वास दर्शवित पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी ऊर्जा, हिम्मत व धाडस दिले. निवडणुकीपुरता पक्ष असतो, मात्र नंतर एक लोक प्रतिनिधी म्ह्णून सर्व समाजघटक व जनतेसाठी कामे करणे एक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. त्यामुळे आपण नेहमीच काम करत आले असून पुढेही काम करत राहू असा मनोदय सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला.