दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासनातर्फे मोहीम

भारत निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशानुसार अमरावती जिल्हा करिता म्हणून माननीय जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांनी पीडब्ल्यूडी करिता स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून श्रीमती. जया राऊत यांची व अधिनस्त सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून श्री. राजेंद्र जाधवर, श्री. ज्ञानबा पुंड, श्री. पुरुषोत्तम शिंदे, श्री. पवन साबळे, श्री. भरत राऊत, श्रीमती. शालिनी गायगोले, श्री. उमेश धुमाळे, श्री. आशिष चुनडे, श्री. पंकज मुदगल व श्री. निरज तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी संपूर्ण जिल्हाभर पीडब्ल्यूडी मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता प्रचार प्रसिद्धीसह विविध उपक्रम राबविण्यात आले त्याचबरोबर दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक नोडल अधिकारी श्री. ज्ञानबा पुंड यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांचे मतदान शंभर टक्के व्हावे याकरिता अमरावती जिल्ह्यातील आठ ही विधानसभा मतदार संघा मध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दिव्यांग संस्थेत कार्यरत 423 मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिव्यांग मतदारांची नाव व पत्त्यासह यादी वाटप करून जिल्ह्यातील 17,175 दिव्यांग मतदाराची मतदानाची जबाबदारी 423 कर्मचाऱ्यांवर देण्यात आली कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष दिव्यांगाशी संपर्क साधून त्याच्या घरापर्यंत जाऊन त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे मतदान करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली यासाठी एकूण 423 दिव्यांग संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यां ची नियुक्ती जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. डी. एम. पुंड यांच्याकडून करण्यात आली एका कर्मचाऱ्याकडे सरासरी 50 दिव्यांग मतदाराची जबाबदारी आली हे संपूर्ण नियोजन सहाय्यक नोडल अधिकारी श्री. उमेश धुमाळे श्री. आशिष चुनाळे श्री. पंकज मुदगल श्री. पि. डी. शिंदे श्री. दीपक दुधबळे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
दिव्यांग संस्थेतील या नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष दिव्यांग मतदारांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना मतदानाकरिता प्रेरित केले व मतदान केंद्रापर्यंत नेण्यापर्यंतची सर्व मदत उपलब्ध करून देऊन त्या दिव्यांग मतदारांचे मोठ्या प्रमाणात मतदान करून घेतले या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत दिव्यांग मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला व बहु संख्येने मतदान केले.
यावेळी ला दिव्यांग मतदारांनी 85 टक्के पेक्षा जास्त मतदान केल्याची खात्री दिव्यांग पीडब्ल्यूडी टीमला आहे