अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांना राष्ट्रीय देशरत्न युवा पुरस्कार

पद्म विभूषण स्व.रतन टाटा यांच्या स्मृतीमध्ये मिळाला सन्मान
डॉ गवई यांनी आई- वडिलांना समर्पित केला सन्मान, अमरावतीकरांचे मानले विशेष आभार
अमरावती – अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई यांना भारतातील सर्वात आदरणीय आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणाऱ्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असलेले पद्म विभूषण स्व रतन टाटा यांच्या स्मृतीमध्ये युवकांना सशक्त करण्याच्या उद्देशाने दिल्या जाणारा राष्ट्रीय देशरत्न राष्ट्रीय युवा पुरस्कार अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून निवड करण्यात आली आहे. भारतीय युवा कल्याण अससोसिएशनच्यावतीने दिलली येथील कमानी एडिटोरियम मध्ये संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री चिराग पासवान, मंत्री रघुराज सिंग, सिनेअभिनेता शहाबाज खान, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, देश की लाडली बेटी, भारत की प्रथम महिला पहलवान गोल्ड मेडलिस्टचे अर्जुन अवार्डी दिव्या काकरान उपस्थित होते. डॉ. मनीष गवई याना राष्ट्रीय देशरत्न राष्ट्रीय युवा पुरस्कार सिनेअभिनेता शहाबाज खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांनी युवक कल्याण क्षेत्रातील विधायक कामगिरी केली आहे. युवा विकास क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम केले आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी चीन, नेपाळ,थायलंड, भूटान, रशिया सह सार्क देशात युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी राष्ट्रबांधणीत – राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद साधला असून मैत्रीचा संदेश दिला आहे.
डॉ गवई यांच्या माध्यमातुन अमरावतीच्या मातीलाराष्ट्रीय पातळीवर देशाच्या युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अशा प्रकारच्या पुरस्काररसाठी अमरावतीच्या युवकाची निवड होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे त्याना युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात त्याना आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवार्डने देखील सनमानित करण्यात आले आहे. त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. रतन टाटा हे भारतातील सर्वात आदरणीय आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असलेले रतन टाटा यांनी त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाने या समूहाची जागतिक स्तरावर मोठी प्रतिष्ठा निर्माण केली.भारतात जेव्हा जेव्हा उद्योगपतींचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात आधी रतन टाटांचे नाव घेतले जाते. रतन टाटा हे केवळ व्यापारी नव्हते तर त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली. रतन टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक म्हटले जाते. रतन टाटा यांनी भारतासाठी अगणित योगदान आणि कार्य केले आहे, जे जग नेहमी लक्षात ठेवेल. त्यांचे संपूर्ण जीवन हे एक यश आहे.पद्म विभूषण स्व रतन टाटा यांच्या स्मृतीमध्ये युवकांना सशक्त करण्याच्या उद्देशाने दिल्या जाणारा राष्ट्रीय देशरत्न राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी देशभरातून नामांकन मागविण्यात आले ज्यात अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांची निवड करण्यात येऊन त्यांना हा हा सन्मान प्रदान करण्यात आला. यासाठी एक विशेष निवड टीमने अमरावतीमध्ये भेट देऊन डॉ. मनीष गवई यांच्याबाबतचे माहिती घेऊन प्रत्यक्ष निवड करणात आली हे विशेष.रतन टाटा यांच्या हयातीत हा पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले होते परंतु त्यांच्या निधनाने हा सन्मान त्यांच्या स्मृतीमध्ये अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई याना प्रदान करण्यात आला. त्यांच्या या विशेष निवड़ीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. पुन्हा एकदा डॉ. मनीष गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. डॉ. मनीष गवई यांनी आपला हा सन्मान आपल्या आई- वडिलांना समर्पित केला असून अमरावतीकरांचे विशेष आभार देखील मानले आहे.