पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो – खो (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित

अमरावती (दि. 22.11.2024)- गोविंद गुरू ट्रायबल युनिव्हर्सिटी, बंसवारा (राजस्थान) येथे 16 ते 19 डिसेंबर, 2024 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो – खो (महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
चमूमध्ये श्रीमती केशरबाई लाहोट महाविद्यालय, अमरावतीची कु. धरती मोहोड, कु. सलोनी खंडारे, कु. तनिषा सवाई व कु. प्राची शेंडे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदराची कु. ज्ञाने·ारी वानखडे, कु. वैष्णवी मस्के, कु. आस्था श्रीवास्तव, स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय, नांदगांव पेठची कु. रेशमा गजभिये, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. अनुश्री अन्नेवार, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. साक्षी वानखडे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीची कु. सनिका सोलव व कु. तृप्ती लढे, एल.बी. अणे महिला महाविद्यालय, यवतमाळची कु. वेदिका काळे व कु. भूमिका कोडपकवार, बी.बी. शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगांवची कु. क्षमता कांबळे, कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकळची कु. वैष्णवी साबे, बी.एस. पाटील महाविद्यालय, परतवाडाची कु. वैदवी सिडाम आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. अ·िानी वानखडे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
चमूचा प्रशिक्षण वर्ग श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे दि. 04 ते 13 डिसेंबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.