AmravatiEducation NewsLatest NewsLocal News
विद्यापीठात 26 नोव्हेंबर रोजी व्याख्यानमाला महानुभाव अध्यासन केंद्राचे आयोजन

अमरावती (दि.22.11.2024) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्राच्यावतीने येत्या 26 नोव्हेंबर, 2024 रोजी दु. 2.30 वा. विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री गोविंदप्रभू : अवलियत्वाकडून अवबोधाकडे’ या विषयावर अमरावती येथील डॉ. दिपक तायडे हे व्याख्यान देणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते राहणार आहेत. तरी या व्याख्यानमालेला उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. महंत सोनपेठकर यांनी केले आहे.