BadneraLatest NewsMaharashtra PoliticsVidhan Sabha Election 2024
बडनेरा मतदार संघात राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा विजयी घोषित
अमरावती, दि. 23 : अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात बडनेरा मतदार संघात राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांना विजयी घोषित करून लोकशाही भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मतमोजणी निरीक्षक प्रांजल हजारिका, बडनेरा निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव, क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी रवी राणा यांना प्रमाणपत्र बहाल करून त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.