राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला.

राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. यात आमचा झालेला पराभव स्वीकरत आहोत. मात्र, आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पवार म्हणाले की, आमची अपेक्षा होती तसा निकाल नाही लागला, पण हा लोकांचा निर्णय आहे. त्यांनी निकालाचे अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आणि आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू. मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी व माझे सहकारी ठरवतील. निवडणुकीपूर्वीही त्यांनी संसद सदस्यतेबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता वर्तवली होती.
लाडकी बहीण योजनेचा प्रभाव
महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला पाठिंबा दिल्याचे पवारांनी मान्य केले. या योजनेत महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले, त्यामुळे महिलांमध्ये प्रभाव पडला.
पवारांनी यंदाच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे सांगितले. तसेच, ईव्हीएमविषयी अधिकृत माहिती घेतल्याशिवाय काही सांगणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले
मोर्शी मतदारसंघात एकूण मतदान 209311
भारतीय जनता पक्षाचे उमेश यावलकर विजयी घोषित-64988
उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर भारतीय जनता पार्टी 99683
देवेंद्र महादेवराव भुयार नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी 34695
मेळघाट मतदारसंघात एकूण मतदान 219667
भारतीय जनता पक्षाचे केवलराम काळे विजयी घोषित-106859
केवलराव तुळशीराम काळे (विजयी) भारतीय जनता पार्टी 145978
डॉ. हेमंत नंदा चिमोटे इंडियन नॅशनल काँग्रेस 39119
तिवसा मतदारसंघात एकूण मतदान 202328
भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखडे विजयी घोषित-8617
राजेश श्रीरामजी वानखडे (विजयी) भारतीय जनता पार्टी 99664
ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर इंडियन नॅशनल काँग्रेस 92047
बडनेरा मतदार संघात एकूण मतदान 212501
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा विजयी घोषित-66974
रवि गंगाधर राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी 127800
प्रिती संजय बंड अपक्ष 60826
अमरावती मतदार संघात एकूण मतदान 215258
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुलभा खोडके विजयी घोषित-5413
सूलभा संजय खोडके (विजयी) नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी 60087
डॉ. सुनिल पंजाबराव देशमुख इंडियन नॅशनल काँग्रेस 54674
धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण मतदान 222575
भारतीय जनता पक्षाचे प्रताप अडसड विजयी घोषित-16228
प्रताप अरूणभाऊ अडसड भारतीय जनता पार्टी 110641 विरेंद्र वाल्मीकराव जगताप इंडियन नॅशनल काँग्रेस 94413
दर्यापूर मतदारसंघात एकूण मतदान 207547
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गजानन लवटे विजयी घोषित-19709
गजानन मोतीराम लवटे शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 87749
रमेश गणपतराव बुंदिले राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी 68040
अचलपूर मतदारसंघात एकूण मतदान 212374
भारतीय जनता पक्षाचे प्रविण तायडे विजयी घोषित-12131
प्रविण वसंतराव तायडे भारतीय जनता पार्टी 78201
बच्चू बा. कडू प्रहार जनशक्ती पार्टी 66070