MaharashtraMaharashtra Politics
विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. महायुतीनं पुन्हा राज्यात एकहाती सत्ता मिळवली.पण या सगळ्यात आता ईव्हीएम मशीनवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात मनसेच्या उमेदवाराला ते राहतात तिथं फक्त दोनच मतं मिळाली आहेत, असा दावा करण्यात येतोय. यावर किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.
दहिसर येथील मनसे उमेदवार राजेश येरूणकर… हे जिथे रहातात त्या भागात त्यांना फक्त २ मतं मिळाली ! पत्नी, मुलगी, आई आणि ते स्वत- असे चार मतदार तर घरचेच होते. त्यांनीही मतदान केले नाही का इव्हीएमबद्दल इतरही अनेक शंका त्यांनी उपस्थित केल्यात. संशय व्यक्त केला जातोय की, हे जनमतानं नाही तर ‘धन’मताने निवडून आलेले आहेत… असा आरोप मनसेच्या उमेडवाराकडून केला जातोय.