विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय.

महायुतीला जनतेने पाठिंबा दिला. काल शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत पराभव मान्य केला. आपल्याला अधिक काम करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे सांगितले जातंय. नुकताच संजय राऊत यांनी महायुतीच्या विजयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी मोठा संशय व्यक्त करत काही आरोपही केले आहेत.
संजय राऊत म्हणाले, कोणत्या एका व्यक्तीवर पराभवाचे खापर फोडता येत नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली आहे. शरद पवारांसारखा नेता ज्याच्यामागे महाराष्ट्र उभा असल्याचे दिसले, त्यांनाही अपयश आले. अपयशाची कारणे शोधली पाहिजे. ती कारणे ईव्हीएम मशीनच्या वापरात आहेत, यंत्रणेचा गैरवापरात आहेत, घटनाबाह्य कृत्यांमध्ये आहेत. मुख्यकारणे ही आहेत त्यापैकी मुख्यकारण शोधावे लागेल.