हिवाळी अधिवेशनाचे पहिले सत्र बारा वाजेपर्यंत स्थगितहिवाळी अधिवेशनाची सभा 27 नोव्हे.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत वसंतराव चव्हाण आणि एस के नुरइस्लाम या माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेत गदारोड सुरू झाला. हे सत्र दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
त्यानंतर दुपारी १२ वाजता हे सत्र सभापती संध्या राय यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होताच, सभेत गदारोळ सुरू झाला. घोटाला है घोटाळा है, याची नारेबाजी विरोधी पक्षांकडून व्हायला लागली. परिस्थिती नियंत्रना बाहेर असल्याची जाणीव होताच, सभापती संध्या राय यांनी आजच्या अधिवेशनाची सभा ही 27 नोव्हेंबर 2024 च्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित केली. या सभा स्थगितीनंतर राज्यातील सत्ता स्थापनेला सुद्धा अल्पविराम लागला. त्यामुळे आता 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान सत्ता स्थापन होईल असा अंदाज वर्तविला जातोय…